।। श्रीराम ।।
सप्रेम नमस्कार,
मी
अनिल वाकणकर, आपणासमोर सद्गुरू परमपूज्य आक्का वेलणकर यांच्या सिध्दहस्त लेखणीतून
साकार झालेल्या स्वयंपाकघरातील दासबोध या ग्रंथाचे भाग सादर करताना मला खूप आनंद
होत आहे. श्रीमत् ग्रंथराज दासबोध हा रत्नाकर आहे. त्यातील वेचक रत्ने प. पू.
आक्कांनी आपल्याकरीता वेचून आपल्यापुढे ठेवली आहेत. आजी आजोबा आणि नातवंडे यांचे
एक वेगळेच जग असते. नातवंडे ही दुधावरची साय असते. ती खराब व्हावी, नासून जावी असे
कुठल्याच आजी आजोबांना वाटत नाही. उलट ती दुधापेक्षा जास्त उपयुक्त व्हावी असेच
वाटत असते.
आपल्या
नातवंडांना न दुखवता त्यांच्या कलाने घेऊन त्यांच्यावर चांगले संस्कार करण्याचे
काम आजी आजोबा करीत असतात. ते कसे खुबीने करता येते याचे दिग्दर्शन प. पू.
आक्कांनी या ग्रंथात केले आहे. आक्कांनी त्यांचे हा ग्रंथ लिहिण्याचे मनोगत या
ग्रंथाच्या प्रस्तावनेत केले आहे. ते पुढील प्रमाणे आहे.
(आज
काल जेथे जावे तेथे हेच ऐकू येते. आक्का! आता तुम्ही तरी मुलांना काही सांगा,
ऐकतच नाहीत. संस्कार वर्गात नावे घातली आहेत. जातात आठवड्यातून एकदा तासभर, पण
काही उपयोग नाही. संस्कार! संस्कार, हा वर्गातल्या
घोकंपट्टीचा विचार नाही. रोजच्या व्यवहारात हसत खेळत वेळच्या वेळी मुलांची चूक
त्यांच्या लक्षांत आणून द्यावी. योग्य ती सुधारणा तेव्हाच करवून घ्यावी. मुलांना
पटलं की चांगला संस्कार आपोआप पक्का होतो. प.पू. गुरूदेवांची कृपा. प्रेरणा
त्यांचीच, स्वयंपाकघरातील दासबोध हेच पटविण्यासाठी लिहावेसे वाटले. प्रेरणा
कार्यान्विन त्यांनीच करवून घेतली. त्यांचेच चरणी अर्पण करते.
आशालता वेलणकर,
अंबरनाथ.)
अशा
या ग्रंथाचे एकूण सात भाग आहेत. ते दररोज आपल्या समोर सादर करणार आहे. ही सद्गुरू सेवा सद्गुरू
आक्कांच्याच चरणी समर्पण.
अनिल अनंत वाकणकर.
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा