।। समर्थ रामदास स्वामी विरचित मारुती स्तोत्रे ।।
४
अंजनीसुत
प्रचंड वज्रपुच्छ कालदंड ।
शक्ती
पाहतां वितंड दैत्य मारिले उदंड ।।१।।
धगधगी
तसी कळा वितंड शक्ति चंचळा ।
चळचळातसे
लिळा प्रचंड भीम आगळा ।।२।।
उदंड
वाढला असे विराट धाकुटा दिसे ।
त्यजूनि
सूर्यमंडळा नभांत भीम आगळा ।।३।।
लुळीत
बाळकी लिळा गिळोनि सूर्यमंडळा ।
बहूत
पोळतां क्षणीं थुंकिलाचि तत्क्षणीं ।।४।।
धग्
घगीत बूबुळा प्रत्यक्ष सूर्य मंडळा ।
कराळ
काळमूख तो रिपूकुळासि दु:ख तो ।।५।।
रूपे
कपी अचाट हा सुवर्णकट्टचास तो ।
फिरे
उदास दास तो खळास काळ भासतो ।।६।।
झळक
झळक दामिनी वितंड काळ कामिनी ।
तयापरी
झळाझळी लुळीत रोमजावळी ।।७।।
समस्त
प्राणनाथ रे करी जना सनाथ रे ।
अतूळ
तूळणा नसे अतूळशक्ति वीलसे ।।८।।
रूपे
रसाळ बाळकू समस्त चित्त चाळकू ।
कपी
परंतु ईश्वरू विशेष लाधला वरू ।।९।।
स्वरुद्र
क्षोभल्यावरी तयासि कोण सावरी ।
गुणागळा
परोपरी सतेजरूप ईश्वरी ।।१०।।
समर्थदास
हा भला कपीकुळांत शोभला ।।
सुरारि
काळ क्षोभला त्रिकूट जिंकिला भला ।।११।।
।। जय जय रघूवीर समर्थ ।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा