समर्थ रामदास स्वामी यांचे अपरिचीत साहित्य
।। श्रीराम ।।
बाग प्रकरण
(परळी येथे मठ स्थापन
केला तेव्हा सांगितलेले हे प्रकरण आहे.)
प्रसंग निघाला स्वभावें ।
बागेमध्ये काय लावावें ।
म्हणूनी घेतलीं नांवे ।
कांहीं एक ।।१।।श्रीराम।।
कांटी रामकांटी फुलें
कांटी । नेपती सहमुळी कारमाटी ।
सावी चिलारी सागरगोटी ।
हिंवर खैर खरमाटी ।।२।।श्रीराम।।
पांढऱफळी करवंदी तरटी ।
आळवी तोरणी चिंचोरटी ।
सिकेकाई वाकेरी घोंटी ।
करंज विळस समुद्रशोक ।।३।।श्रीराम।।
अव्हाटी बोराटी हिंगणबेटी
। विकळी टांकळी वाघांटी ।
शेर निवडुंग कारवेटी ।
कांटे शेवरी पांगेरे ।।४।।श्रीराम।।
निरगुडी येरंड शेवरी । कासवेद कासळी पेरारी ।
तरवड उन्हाळ्या कुसरी ।
शीबी तिव्हा अंबोटी ।।५।।श्रीराम।।
कांतुती कचकुहिरी सराटी ।
उतरणी गुळवेल चित्रकुटी ।
कडोची काटली गोमाटी । घोळ
घुगरी विरभोटी ।।६।।श्रीराम।।
भोंस बरू वाळा मोळा । उंस
कास देवनळा ।
लव्हे पानि पोरोस पिंपळा
। गुंज कोळसरे देवपाळा ।।७।।श्रीराम।।
वेत कळकी चिवारी । ताड
माड पायरी पिंपरी ।
उंबरी अंबरी गंभिरी ।
अडुळसा मोही भोंपळी ।।८।।श्रीराम।।
साव सिसवे सिरस कुड । कोळ
कुंभा धावडा मोड ।
काळकुडा भुता बोकडा ।
कुरंडी हिरंडी लोखंडी ।।९।।श्रीराम।।
विहाळ गिळी टेंभुरणी ।
अविट एणके सोरकिन्ही ।
घोळी दालचिनी । कबाब चिनी
जे ।।१०।।श्रीराम।।
निंबोरे गोडे निंब । नाना
महावृक्ष तळंब ।
गोरक्ष चिंच लातंब ।
परोपरीची ।।११।।श्रीराम।।
गोधनी शेलवंटी भोंकरी ।
मोहो बिब्बा रायबोरी ।
बेल फणस जांब भरी । चिंच
अंबसोल अंबाडे ।।१२।।श्रीराम।।
चांफे चंदन रातांजन ।
पतंग मैलागर कांचन ।
पोपये खेलेले खपान । वट
पिंपळ उंबर ।।१३।।श्रीराम।।
आंबे निंबे साखरनिंबे ।
रेकण्या खरजूरी तुतें दाळिंबें ।
तुरडे विडेल नारिंगें ।
शेव कविट अंजीर सीताफळें ।।१४।।श्रीराम।।
जांब अननस देवदार । सुरमे
खासे मंदार ।
पांढरे जंगली लाल पुरे ।
उव्दे चित्रकीं ।।१५।।श्रीराम।।
केळी नारळी पोफळी । आंवळी
रायआंवळी जांभळी ।
कुणकी गुगुळी सालफळी ।
वेलफळी माहाळुंगी ।।१६।।श्रीराम।।
भुईचांफे नागचांफे मोगरे
। पारिजातक बटमोगरे ।
शंखासुर काळे मोगरे ।
सोनतरवड सोनफुले ।।१७।।श्रीराम।।
जाई सखजाई पीतजाई ।
त्रिविध शेवती मालती जुई ।
पाडळी बकुळी अबई । नेवाळी
केतकी चमेली ।।१८।।श्रीराम।।
सूर्यकमळिणी चंद्रकमळिणी
। जास्वनी हनुमंत जास्वनी ।
केशर कुसुंबी कमळिणी ।
बहुरंग निळयाती ।।१९।।श्रीराम।।
तुळसी काळी त्रिसेंदरी ।
त्रिसिंगी रायचचु रायपेटारी ।
गुलखत निगुलचिन कनेरी ।
नानाविध मखमाली ।।२०।।श्रीराम।।
काळा वाळा मरूवा नाना ।
कचोरे गवले दवणा ।
पाच राजगिरे नाना । हळदी
करडी गुलटोप ।।२१।।श्रीराम।।
वांगी चाकवत मेथी पोकळर ।
माठ शेपु खोळ बसळा ।
चवळी चुका वेल सबळा ।
अंबु जिरें मोहरी ।।२२।।श्रीराम।।
कांदे मोळकांदे माईणमुळें
। लसूण आलं रताळें ।
कांचन कारिजे माठमुळें ।
सुरण गाजरें ।।२३।।श्रीराम।।
भोंपळे नाना प्रकारचे ।
लहानथोर पत्रवेलीचें ।
गळ्याचे पेढ्या सांगडीचे
। वक्र वर्तुळ लंबायमान ।।२४।।श्रीराम।।
गंगाफळ काशीफळें क्षीरसागर
। सुगरवे सिंगाडे देवडांगर ।
दुधे गंगारूढे प्रकार ।
किनऱ्या रुद्रविण्याचे ।।२५।।श्रीराम।।
वाळक्या कांकड्या चिवड्या । कोहाळे सेंदण्या सेंदाड्या ।
खरबुजा तरबुजा कलंगड्या ।
द्राक्षी मिरवेली पानवेली ।।२६।।श्रीराम।।
दोडक्या पारोशा पडवळ्या ।
चवळ्या कारल्या तोंडल्या ।
घेवड्या कुहिऱ्या
खरसमुळ्या । वेली अळूचमकोरे ।।२७।।श्रीराम।।
अठराभार वनस्पती । नामें
सांगावीं किती ।
अल्प बोलिलों श्रोता ।
क्षमा केली पाहिजे ।।१८।।श्रीराम।।
।। जय जय रघूवीर समर्थ ।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा