समर्थ रामदास स्वामी विरचित मारुती स्तोत्रे
६
फणिवर
उठवीला वेग अद्भूत केला ।
त्रिभुवन
जनलोकीं किर्तिचा वोघ गेला ।।
रघुपति
उपकारें दाटले थोर भारें ।
परम
धिर उदारें रक्षिलें सौख्यकारें ।।१।।
सबळ
दळ मिळालें युध्द ऊदंड झालें ।
कपिकटक
निमालें पाहतां येश गेलें ।।
परदळ
शरघातें कोटिच्या कोटि प्रेतें ।
अभिनव
रणपातें दु:ख बीभीषणातें ।।२।।
कपि
रिस घनदाटी, जाहली थोर आटी ।
म्हणउनि
जगजेठी धांवणें चारि कोटी ।।
मृति
विरहित ठेले मोकळे सिध्द झाले ।
सकळ
जन निवाले धन्य सामर्थ्य चाले ।।३।।
बहु
प्रिय रघुनाथा मुख्य तूं प्राणनाथा ।
उठविं
मज अनाथा दूर सारूनि वेथा ।।
झडकरिं
भिमराया तूं करीं दृढ काया ।
रघुविर
भजना या लागवेगेंचि जाया ।।४।।
तुजविण
मज पाहें पाहतां कोण आहे ।
म्हणउनि
मन माझे रे?
तुझी वाट पाहे ।।
मज
तुज निरवीलें पाहिजे आठवीलें ।
सकळिक
निज दासांलागिं सांभाळवीलें ।।५।।
उचित
हित करावें उध्दरावें धरावें ।
अनहित
न करावें त्वां जनी येश घ्यावें ।।
अघटित
घडवावें सेवकां सोडवावें ।
हरिभजन
घडावें दु:ख तें वीघडावें ।।६।।
प्रभुवर
विरराया! जाहली वज्र काया ।
परदळ
निवटाया दैत्यकूळें कुटाया ।।
गिरिवर
उतटाया रम्यवेषें नटाया ।
तुजचि
अलग ठाया ठेविलें मुख्य ठाया ।।७।।
बहुत
सबळ सांठा मागतों अल्प वांटा ।
न
करित हित कांटा थोर होईल ताठा ।।
कृपणपण
नसावें भव्य लोकीं दिसावें ।
अनुदिन
करूणेचें चिन्ह पोटीं वसावें ।।८।।
जळधर
करूणेचा अंतरामाजि राहे ।
तरि
तुज करूणा हे कां नये सांग पां हे ।।
कठिण
ह्रदय जालें?
काय कारुण्य गेले? ।
न
पवसि मज कां रे म्यां तुझें काय केलें ।।९।।
वडिलपण
करावें सेवकां सांवरावें ।
अनहित
न करावें तूर्त हातीं धरावें ।।
निपटचि
हटवादें प्रार्थिला शब्दभेदें ।
कपि
घन करूणेचा वोळला रामवेधें ।।१०।।
बहुतचि
करुणा या लोटली देवराया ।
सहजचि
कफकेतें जाहली वज्र काया ।।
परम
सुख विलासे सर्वदा सानुदासें ।
पवन
तनुज तोषें वंदिला सावकाशें ।।११।।
।। जय जय रघूवीर समर्थ ।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा