समर्थ रामदास स्वामी विरचित मारूती स्तोत्रे
९
लघूशी
परी मूर्ति हे हाटकाची ।
करावी
तथा मारुती नाटकाची ।।
असावी
सदा ताइतामाजि दंडीं ।
समारंगणीं
पाठ दीजे उदंडीं ।।१।।
ठसा
हेम धातूवरी वायूसुतू ।
तथा
ताइताचे परी रौप्य धातू ।।
तयाची
पुजा मंदवारीं करावी ।
बरी
आवडी आर्त पोटीं धरावी ।।२।।
स्वधामासि
जाता प्रभू रामराजा ।
हनूमंत
तो ठेविला याच काजा ।।
सदा
सर्वदा राम दासासि पावे ।
खळी
गांजितां ध्यान सोडून धांवे ।।३।।
।। जय जय रघूवीर समर्थ ।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा