समर्थांचे अपरिचीत वाङ्मय
षड्रिपू निरुपण
समास पहिला-काम निरूपण
भल्यांसी वैर करिताती ते
साही वोळखां बरें ।
षड्रिपू कामक्रोधादि मद
मत्सर दंभ तो ।।१।।श्रीराम।।
प्रपंच साहवा वैरी हे वैरी
जिंकितां बरें ।
भल्यांमी लाविती वेढा परत्रमार्ग
रोधिला ।।२।।श्रीराम।।
काम
आरंभिंचा वैरी निष्काम बुडवी सदा ।
कामना
लागली पाठी काम काम करी जनीं ।।३।।श्रीराम।।
काम
उत्पन्न होताहे ते वेळे नावरे जनां ।
कामवेडे
जडे ज्याला तो प्राणी आत्मघातकी ।।४।।श्रीराम।।
कित्येक
योषितेसाठीं कातरा मृत्यु पावले ।
झडाच
घालिती नेटें पतंगापरि भस्मती ।।५।।श्रीराम।।
आपणा
राखणें नाही शुध्दि नाहीं म्हणोनियां ।
सभाग्य
करंटे होती वेश्येसी द्रव्य नासिती ।।६।।श्रीराम।।
कित्येक
भोरपी झाले किती गेले उठोनिया ।
बाटले
भ्रष्टले मेले बुडाले कामवेसनीं ।।७।।श्रीराम।।
व्याधीनं
नासती अंगे नासिकें झडती जनीं ।
औषधे
दंतही जाती रुपहानीहि होतसे ।।८।।श्रीराम।।
रूपहानी
शक्तिहानी द्रव्यहानी परोपरीं ।
कुलहानी
यातिहानी सर्व हानीच होतसे ।।९।।श्रीराम।।
कित्येक
मातले भोगें लोकलाजची सांडिली ।
शुभाशुभ
नसे तेथें नीचाशी उंच भ्रष्टती ।।१०।।श्रीराम।।
कामाचे
व्यसनें गेले मातले रतले जनीं ।
तारुण्य
दोंदिलांसाठी जन्म दुल्लभ नाशिला ।।११।।श्रीराम।।
विधीनें
विषयो घ्यावा अविधी नसतां बरें ।
आश्रमीं
न्याय नीतीनें प्रपंच करणें सुखें ।।१२।।श्रीराम।।
घुटक्याने
नासती काया चेटकें ती परोपरी ।
जारणमारणादीकें
नाटकें चेटकें बहु ।।१३।।श्रीराम।।
चेडकां
देवते भूते जन्महानीच होतसे ।
म्हणोनि
काम हा वैरी आकळावा परोपरी ।।१४।।श्रीराम।।
ऐसा
निरूपिला काम क्रोध तो बोलिला पुढे।
कोपतो
तामसी प्राणी तमोगुणें अधोगति ।।१५।।
इति
कामनिरूपणं समाप्तम् ।।१।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा