समर्थ रामदास स्वामी विरचित मारूती स्तोत्रे
११
बळें सर्व संहारिलें रावणाला ।
दिले
अक्षयी राज्य बीभीषणाला ।।
रघूनायकें
देव ते मुक्त केले ।
अयोध्यापुरीं
जावया सिध्द जाले ।।१।।
पथामाजी
कृष्णातिरीं रामराया ।
घडे
राहणे स्नानसंध्या कराया ।।
सिता
राहिली शीरटें गांव जेथें ।
रघूराज
तो पश्चिमेचेनि पंथे ।।२।।
जप
ध्यान पूजा करी रामराजा ।
तयाचे
परी वीर सौमित्र वोजा ।।
स्मरेना
देहें चित्त ध्यानस्थ जालें ।
अकस्मात
तें तोय अद्भूत आलें ।।३।।
बळे
चालिला ओघ नेटें भडाडां ।
नभीं
धावती लोट लाटा धडाडां ।।
नदी
चालली राम ध्यानस्त जेथें ।
बळें
विक्रमे पावला भीम तेथे ।।४।।
उभा
राहिला भीमरूपी स्वभावें ।
बळें
तुंब तो तुंबिला दोन गांवें ।।
नदी
एक वीभागली दोन्ही बाहें ।
म्हणोनी
तया नांव हे गांव बाहें ।।५।।
सुखे
लोटतीं देखतां रामलिंगा ।
बळे
चालिली भोंवती कृष्णगंगा ।।
परी
पाहतां भीम तेथें दिसेना ।
उदासीन
हें चित्त कोठें वसेना ।।६।।
हनूमंत
पाहावया लागिं आलो ।
दिसेना
सखा थोर विस्मीत जालों ।।
तयावीण
देवालयें तीं उदासे ।
जळांतून
बोभाइला दास दासें ।।७।।
मनांतील
जाणोनि केला कुढावा ।
दिले
भेटिचा जाहला थोर यावा ।।
बळें
हांक देतांचि तैसा गडाडी ।
महामेघ
गंभीर जैसा घडाडी ।।८।।
रघूराज
वैकुंठ धामासि गेले ।
तधीं
मारूती दास हे निरवीले ।।
रघूनाथ
ऊपासकाला प्रसंगें ।
सख्या
मारूती पाव रे लागवेगें ।।९।।
प्रभूचें
महावाक्य त्वां साच केलें ।
म्हणे
दास हें प्रत्यया सत्य आलें ।।
जनामाजि
हें सांगतां पूरवेना ।
अवस्था
मनीं लागली ते सरेना ।।१०।।
।। जय जय रघूवीर समर्थ ।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा