समर्थ रामदास स्वामी विरचित मारुती स्तोत्रे
८
भुवन
दहन काळीं काळ विक्राळ जैसा ।
सकळ
गिळित ऊभा भासला भीम तैसा ।।
दुपटत
कपि झोकें झोकिली मेदिनी हे ।
तळवट
धरि धाकें धोकली जाउं पाहे ।।१।।
गिरिवरूनि
उडाला तो गिरी गुप्त झाला ।
घसरत
दश गांवें भूमिकेमाजि आला ।।
उडति
झडझडाटें वृक्ष हे नेटपाटें ।
पडति
कडकडाटें अंग घाते धुधाटें ।।२।।
थरथरित
थरारी वज्र लांगूल जेव्हां ।
गरगरित
गरारी सप्तपाताळ जेव्हां ।।
फणिवर
कमठाचे पृष्ठिशीं आंग घाली ।
तगटित
पवनाची झेंप लंकेसि गेली ।।३।।
थरकत
धऱणी हे हाणतां वज्रपुच्छें ।
रगडित
रणरंगीं राक्षसें तृणतुच्छें ।।
सहज
रिपुदळाचा थोर संव्हार केला ।
आवघड
गड लंका शीघ्र जाळून आला ।।४।।
सहज
करतळें जो मेरुमांदार पाडी ।
दशवदन
रिपू हे कोण कीती बराडी ।।
अगणित
गणवेना शक्ति काळासि हारी ।
पवन
तनुज पाहो पूर्ण रुद्रावतारी ।।५।।
।। जय जय रघूवीर समर्थ ।।
khup chan...
उत्तर द्याहटवा