बुधवार, १८ एप्रिल, २०१८

नवदुर्गा माहिती भाग ८


।।अष्टमम् महागौरी।।

मूलमंत्र
श्वेते वृषे समारूढा श्वेताम्बरधरा शुचि:।
महगौरी शुभं दद्यान्महादेवप्रमोददा।।
ध्यान
वंदे वांछित कामार्थेचन्द्रार्घकृतशेखराम्।
सिंहारुढाचतुर्भुजामहागौरीयशस्वीनीम्।।
पुणेन्जुनिभांगौरी सोमवक्रस्थितांअष्टम दुर्गा त्रिनेत्रम्।
वराभीतिकरांत्रिशूल डमरुधरांमहागौरींभजेम्।।
पटाम्बरपरिधानामृदुहास्यानानालंकारभूषिताम्।
मंजीर, कार, केयूर, किंकिणिरत्न कुण्डल मण्डिताम्।।
प्रफुल्ल वदनांपल्लवाधरांकांत कपोलांचैवोक्यमोहनीम्।
कमनीयांलावण्यांमृणालांचंदन गन्ध लिप्ताम्।।
स्तोत्र
सर्वसमंकट हंत्रीत्वंहिधन ऐश्वर्य प्रदायनीम्।
ज्ञानदाचतुर्वेदमयी महागौरीप्रणमाम्यहम्।।
सुख शांति दात्री, धन धान्य प्रदायनीम्।
डमरुवाघप्रिया अघा महागौरीप्रणमाम्यहम्।।
त्रैलोक्यमंगलात्वंहितापत्रयप्रणमाम्यहम्।
वरदाचैतन्यमयी महागौरीप्रणमाम्यहम्।।
कवच
ओंकार: पातुशिर्षोमां, ह्रीं बीजंमां ह्रदयो।
क्लींबीजंसदापातुनभोगृहोचपादयो।।
ललाट कर्णो हूं, बीजपात महागौरीमांनेत्र घ्राणों।
कपोल चिबुकोफट् पातुस्वाहा मां सर्ववदनो।।
दुर्गा मातेचे आठवे रूप म्हणजे महागौरी होय. दुर्गापूजेच्या आठव्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते. महागौरीची पूजा केल्याने सर्व पापे धुऊन जातात. भविष्यात पाप-संताप, दु:ख त्याच्याजवळ कधीही येत नाही. तो सर्व प्रकारच्या पवित्र आणि अक्षय पुण्याचा अधिकारी होतो.
देवी शैलपुत्री वयाच्या सोळाव्या वर्षी अत्यंत सुंदर व गौरवर्णी होती. तिच्या ह्या अत्यंत गौरवर्णी रुपास महागौरी असे म्हणतात. तिची तुलना शंख, चंद्र तसेच कुंद नावाच्या सफेद फुलाशी करतात. ती फक्त सफेद वस्त्र परिधान करते त्यामुळे तिला श्वेतंभरा देखील म्हणतात. तिचे वाहन बैल असून तिला चार हात आहेत. तिच्या एक उजव्या हातात त्रिशूल असून दुसरा उजवा हात अभय मुद्रेत आहे. तिच्या एका डाव्या हातात डमरू असून दुसरा डावा हात वरद मुद्रेत आहे. महागौरी अत्यंत शांत स्वभावाची आहे.
आपल्या पार्वती रूपात तिने भगवान शंकराला पती रूपात प्राप्त करण्यासाठी कठोर तपस्या केली होती. गोस्वामी तुळशीदास यांच्या अनुसार तिने भगवान शंकराला पती करण्यासाठी कठोर संकल्प केला होता-
जन्म कोटि लगि रगर हमारी।
बरॐ संभु न त रहॐ कुँआरी।।
या कठोर तपस्येमुळे तिचे शरीर काळे पडले होते. तिच्या कठोर तपस्येवर प्रसन्न होऊन भगवान शंकराने तिला गंगेच्या पवित्र पाण्याने आंघोळ घातल्यावर ती अत्यंत गोरी दिसू लागली. तेव्हापासून तिला महागौरी या नावाने संबोधले जाते. देवी महागौरीचे स्मरण, पूजा भक्तांसाठी सर्वाधिक कल्याणकारी आहे. माता महागौरी गायन तसेच संगीतसेवेने प्रसन्न होते. आपण नेहमी तिचे ध्यान केले पाहिजे. तिच्या कृपेमुळे अलौकीक सिद्धी प्राप्त होते. महागौरी भक्ताचे संकट अवश्य दूर करते.
मंत्र, ध्यान, कवच याच्या योगे तिची उपासना करणा-या भक्ताचे सोमचक्र जागृत होते. तिच्या उपासनेमुळे अशक्य कार्य शक्य होते आणि पापांचा विनाश होतो. तिला शरण जाण्यासाठी आपण अधिक प्रयत्न केला पाहिजे. देवी महागौरीचा महिमा पुराणात वर्णिला आहे. माता महागौरीची प्रार्थना पुढील मंत्रानी करावी.
या देवी सर्वभू‍तेषु माँ महागौरी रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा