।। चर्पटपंजरिकास्तोत्रम् ।।
दिनमपि रजनी सायं प्रातः शिशिरवसन्तौ पुनरायातः।
कालः क्रीडति गच्छत्यायुः तदपि न मुञ्चत्याशावायु।।
भज गोविंदं भज गोविंदं भज गोविंदं मूढमते।
प्राप्ते सन्निहितेमरणे नहि नहि रक्षति डुकृञ्
करणे।।१।।
दिवस आणि रात्र, सकाळ आणि संध्याकाळ, शिशिर आणि वसंत ऋतू पुनः पुनः येतात आणि जातात. ह्या प्रमाणे काळाची क्रीडा चालत आहे आणि आयुष्य
निघुन जाते आहे। परंतु आशारुपी वायू हा देह सोडत नाही. तेव्हा हे मूर्खा! गोविंदाला भज, त्याला शरण जा.
मृत्यू जवळ आल्यावर डुकृञ् करणे घोकत राहिल्याने तुझे रक्षण होणार नाही.
अग्रे वह्निः पृष्टे भानू राञौ चिबुक समर्पित जानुः।
करतल भिक्षा तरुतलवासस् तदपिन मुञ्चत्याशापाशः।
भज गोविंदं भज गोविंदं भज गोविंदं मूढमते।
प्राप्ते सन्निहितेमरणे नहि नहि रक्षति डुकृञ्
करणे।।२।।
दिवसा पुढे विस्तव आणि मागे सूर्यकिरणे शरिर
तापवित असतात, रात्री गुढग्यामध्ये हनुवटी खुपसून बसलेला असतोस, हातावरच भिक्षा मागून
आणतोस, वृक्षाच्या सावलीत पडून असतोस, तरीपण आशेचा पाश काही सुटत नाही, सैल होत नाही.
तेव्हा हे मूर्खा! गोविंदाला भज, त्याला शरण जा. मृत्यू जवळ आल्यावर डुकृञ् करणे घोकत
राहिल्याने तुझे रक्षण होणार नाही.
यावद्वित्तो पार्जनसक्तः तावन्निज् परिवारो रक्तः।
पश्चाद्धावति जर्जरदेहे वार्ता पृच्छति को$पि न
गेहे।।
भज गोविंदं भज गोविंदं भज गोविंदं मूढमते।
प्राप्ते सन्निहितेमरणे नहि नहि रक्षति डुकृञ्
करणे।।३।।
अरे! जोपर्यंत तू धन कमावतो आहेस, तो पर्यंतच
तुझ्या कुटुंबातील लोक तुझ्यावर प्रेम करतील, पाठीमागे धावतिल पण वृद्धत्वाने देह जर्जर झाल्यावर मात्र तुला कोणीही विचारणार नाही. तेव्हा हे मूर्खा! गोविंदाला भज,
त्याला शरण जा. मृत्यू जवळ आल्यावर डुकृञ् करणे घोकत राहिल्याने तुझे रक्षण होणार नाही.
जटिलो मुंडी लुंञ्चितकेशः काषायाम्बर बहुकृतवेषः।
पश्यन्नपि च न पश्यति मूढः उदर निमित्तं बहुकृत
शोकः।।
भज गोविंदं भज गोविंदं भज गोविंदं मूढमते।
प्राप्ते सन्निहितेमरणे नहि नहि रक्षति डुकृञ्
करणे।।४।।
कोणी जटा धारण करतो तर कोणी मुण्डण करुन घेतो.
कोणी केस लोचतो तर .कोणी भगवी वस्त्रे धारण
करतो. पाहत असूनही लोक न पाहील्या सारखे करतात.
पोटासाठी लोक अनेक सोंग घेतात. पण भगवंताला भजत नाहीत. तेव्हा हे मूर्खा! गोविंदाला भज, त्याला शरण जा.
मृत्यू जवळ आल्यावर डुकृञ् करणे घोकत राहिल्याने तुझे रक्षण होणार नाही.
भगवद्गीता किञ्चिदधीता गङ्गाजल लवकणिका पीता।
सकृदपि यस्य मुरारिसमर्चा तस्या यमः किं कुरुते
चर्चाम्।।
भज गोविंदं भज गोविंदं भज गोविंदं मूढमते।
प्राप्ते सन्निहितेमरणे नहि नहि रक्षति डुकृञ्
करणे।।५।।
ज्याने भक्तीयुक्त अंतःकरणाने थोडीशी तरी भगवद्गीता
वाचली आहे. ज्याने श्रद्धेने गंगाजळाचा एक थेंब तरी प्राशन केला आहे, प्रेमाने भगवान श्रीकृष्णाची एकदा तरी
पूजा केली आहे, त्याला यमराज तरी काय करू शकेल?
तेव्हा हे मूर्खा! गोविंदाला भज, त्याला शरण जा. मृत्यू जवळ आल्यावर डुकृञ्
करणे घोकत राहिल्याने तुझे रक्षण होणार नाही.
अङ्गं गलितं पलितं मुण्डं दशनविहीनं जातं तुण्डम्।
वृद्धो याति गृहित्वा दण्डं तदपि न मुञ्चत्याशापिण्डम्।।
भज गोविंदं भज गोविंदं भज गोविंदं मूढमते।
प्राप्ते सन्निहितेमरणे नहि नहि रक्षति डुकृञ्
करणे।।६।।
सर्व शरीर गळाठुन गेले आहे, थकले आहे.
डोक्याचे केस पांढरे झाले आहेत. तोंडात दात राहिले नाहीत, म्हातारा झाला आहेस, कसा तरी काठी टेकीत चालतो आहेस.
परंतु आशा काही पिण्ड (देह) सोडत नाही. तेव्हा
हे मूर्खा! गोविंदाला भज, त्याला शरण जा. मृत्यू जवळ आल्यावर डुकृञ् करणे घोकत राहिल्याने
तुझे रक्षण होणार नाही.
बालस्तावत्क्रीडासक्तस्तरुणस्तावत् तरुणीरक्तः।
वृद्धस्तावच्चिन्तामग्नः परे ब्रह्मणि को$पि न लग्नः।।
भज गोविंदं भज गोविंदं भज गोविंदं मूढमते।
प्राप्ते सन्निहितेमरणे नहि नहि रक्षति डुकृञ्
करणे।।७।।
बालपणी खेळण्यामध्ये रमतो, तरुणपणी स्ञीमध्ये
रमतो, वृद्धत्व आल्यावर चिंतामग्न होऊन रहातो. परंतु परब्रह्माशी कोणीच संलग्न झालेला
दिसत नाही. तेव्हा हे मूर्खा! गोविंदाला भज, त्याला शरण जा. मृत्यू जवळ आल्यावर डुकृञ्
करणे घोकत राहिल्याने तुझे रक्षण होणार नाही
पुनरपि जननं पुनरपि मरणं पुनरपि जनशी जठरे शयनम्।
इह संसारे खलु दुस्तारे कृपयापारे पाहि मुरारे।।
भज गोविंदं भज गोविंदं भज गोविंदं मूढमते।
प्राप्ते सन्निहितेमरणे नहि नहि रक्षति डुकृञ्
करणे।।८।।
या संसारात पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो,
पुन्हा पुन्हा मरावे लागते. अशा ह्या अत्यंत दुस्तर आणि अपार संसार सागरांतून हे मुरारे
श्रीकृष्णा! मला पार कर अशी प्रार्थना करित गोविंदाला भज. मृत्यू जवळ आल्यावर डुकृञ् करणे घोकत राहिल्याने
तुझे रक्षण होणार नाही.
पुनरपि रजनी पुनरपि दिवसः। पुनरपि पक्षः पुनरपि
मासः।।
पुनरप्ययनं पुनरपि वर्षं तदपि न मुञ्चत्याशामर्षम्।
भज गोविंदं भज गोविंदं भज गोविंदं मूढमते।
प्राप्ते सन्निहितेमरणे नहि नहि रक्षति डुकृञ्
करणे।।९।।
दिवस, रात्र, पंधरवडा, महिना, वर्ष, अयन हे पुन्हा
पुन्हा येतात आणि जातात. अशा रितीने आयुष्य
संपत जाते, तरी मनुष्य आशा, ईर्षा, काम, क्रोध
आदि विकारांचा त्याग करीत नाही. तेव्हा हे मूर्खा! गोविंदाला भज, त्याला शरण जा. मृत्यू
जवळ आल्यावर डुकृञ् करणे घोकत राहिल्याने तुझे रक्षण होणार नाही.
वयसि गते कः कामविकारः। शुष्के नीरे कः कासारः।।
नष्टे द्रव्ये कः परिवारो। ज्ञाते तत्वे कः संसारः।।
भज गोविंदं भज गोविंदं भज गोविंदं मूढमते।
प्राप्ते सन्निहितेमरणे नहि नहि रक्षति डुकृञ्
करणे।।१०।।
वय निघुन गेल्यावर कामविकाराला काय अर्थ आहे?
पाणी आटून गेल्यावर सरोवराचा काय उपयोग? जवळ
असलेले धन संपल्यावर, परिवारही सोडून जातो. त्याचप्रमाणे तत्वज्ञान प्राप्त झाल्यानंतर संसार
राहतोच कुठे? तेव्हा हे मूर्खा! गोविंदाला
भज, त्याला शरण जा. मृत्यू जवळ आल्यावर डुकृञ् करणे घोकत राहिल्याने तुझे रक्षण होणार
नाही.
नारीस्तनभरनाभिनिवेशं मिथ्यामाया मोहा वेशम्।
एतन्मांस वसादिविकारं मनसि विचारय वारं वारम्।।
भज गोविंदं भज गोविंदं भज गोविंदं मूढमते।
प्राप्ते सन्निहितेमरणे नहि नहि रक्षति डुकृञ्
करणे।।११।।
स्ञी शरीराच्या आकर्षणाने मोहित होऊ नकोस.
ज्याच्याबद्दल मोह ठेवायचा ते शरिर तरी रक्त, मांस, हाडे, चरबी इत्यादि विकारांच्या
पेक्षा वेगळे नाही ह्याचा मनात वारंवार विचार
कर आणि गोविंदाला भज.त्याला शरण जा. मृत्यू जवळ आल्यावर डुकृञ् करणे घोकत राहिल्याने
तुझे रक्षण होणार नाही.
कस्त्वं को$हं कुत आयातः का मे जननी कोमे तातः।
इति परिभावय सर्व मसारं विश्वं त्यक्त्वा स्वप्नविचारम्।।
भज गोविंदं भज गोविंदं भज गोविंदं मूढमते।
प्राप्ते सन्निहितेमरणे नहि नहि रक्षति डुकृञ्
करणे।।१२।।
तू कोण आहेस? मी कोण आहे? मी कोठून आलो? माझी आई कोण?
माझे वडील कोण? या सर्व गोष्टींचा विचार कर.
हे विश्व असार आहे. म्हणून हे सर्व सोडून देऊन गोविंदाला भज, त्याला शरण जा. मृत्यू
जवळ आल्यावर डुकृञ् करणे घोकत राहिल्याने तुझे रक्षण होणार नाही.
गेयं गीतानामसह्ञं ध्येयं श्रीपति रूपमजस्रम्।
नेयं सज्जनसङ्गे चित्तं देयं दीनजनाय च वित्तम्।।
भज गोविंदं भज गोविंदं भज गोविंदं मूढमते।
प्राप्ते सन्निहितेमरणे नहि नहि रक्षति डुकृञ्
करणे।।१३।।
गीता आणि विष्णू सहस्ञनाम नेहमी जपत रहावे. भगवान विष्णुंच्या
स्वरूपाचे निनित्य चिंतन करीत जावे. चित्त संत सज्जनांच्या संगतीत लावावे आणि आपल्या
जवळची धन संपत्ती दीन, दुबळे, अपंग अशा लोकांना देत जावी. तेव्हा हे मूर्खा! गोविंदाला
भज, त्याला शरण जा. मृत्यू जवळ आल्यावर डुकृञ् करणे घोकत राहिल्याने तुझे रक्षण होणार
नाही.
यावज्जीवो निवसति देहे कुशलं तावत्पृच्छती गेहे।
गतवति वायौ देहापाये भार्या बिभ्यति तस्मिन्काये।।
भज गोविंदं भज गोविंदं भज गोविंदं मूढमते।
प्राप्ते सन्निहितेमरणे नहि नहि रक्षति डुकृञ्
करणे।।१४।।
जोपर्यंत या शरीरात प्राण आहेत तो पर्यंतच लोक घरात
कुशल विचारतात. देहातून प्राण निघुन गेल्यावर त्या देहाजवळ जायला बायको सुद्धा भिते
मग इतरांची काय कथा. तेव्हा हे मूर्खा! गोविंदाला भज, त्याला शरण जा. मृत्यू जवळ आल्यावर
डुकृञ् करणे घोकत राहिल्याने तुझे रक्षण होणार नाही.
सुखतः क्रियते रामाभोगः पश्चाद्धन्त शरिरे रोगः।
यद्यपि लोके मरणं शरणं तदपि न मुञ्चति पापाचरणम्।।
भज गोविंदं भज गोविंदं भज गोविंदं मूढमते।
प्राप्ते सन्निहितेमरणे नहि नहि रक्षति डुकृञ्
करणे।।१५।।
विषयांचा
उपभोग घेताना प्रथम सुख वाटते पण पाठीमागून शरीरात अनेक रोग घर करतात. शेवटी मरण ठरलेलेच
आहे. तरीही मनुष्य पापाचरण सोडून देत नाही. तेव्हा भल्या माणसा ! गोविंदाला भज, त्याला
शरण जा. मृत्यू जवळ रथ्याचर्पट आल्यावर डुकृञ् करणे घोकत राहिल्याने तुझे रक्षण होणार
नाही.
विरचित कन्धः
पुण्यापुण्य विवर्जित पन्थः।
नाहं न त्वं
नायं लोकस्तदपि किमर्थं क्रियते शोकः।।
भज गोविंदं भज
गोविंदं भज गोविंदं मूढमते।
प्राप्ते सन्निहितेमरणे
नहि नहि रक्षति डुकृञ् करणे।।१६।।
रस्त्यात पडलेल्या चिंध्या गोळा करून गोधडी बनवतोस.
पाप पुण्याचाही विचार सोडून देतोस. तू, मी, हे सर्व खोटे आहे असेही म्हणतोस. तर मग
व्यर्थ शोक कशासाठी करतोस? क्रोध आदि विकारांचा त्याग करीत नाही. तेव्हा हे मूर्खा!
गोविंदाला भज, त्याला शरण जा. मृत्यू जवळ आल्यावर डुकृञ् करणे घोकत राहिल्याने तुझे
रक्षण होणार नाही.
कुरूते गंगा सागर गमनं व्रतपरिपालनमथवा दानम्।
ज्ञानविहीनः सर्वमतेन मुक्तिं न भजति जन्म शतेन।।
भज गोविंदं भज गोविंदं भज गोविंदं मूढमते।
प्राप्ते सन्निहितेमरणे नहि नहि रक्षति डुकृञ्
करणे।।१७।।
भलेही गंगा, सागर, काशी, गया इत्यादी तीर्थक्षेत्री जावोत, नाना व्रते, उपासना करोत, दाने करोत, परंतु शेकडो
जन्म घेतले तरी ज्ञानावाचून मोक्ष मिळणार नाही हा सिद्धांत आहे. म्हणून गोविंदाला भज.त्याला,
त्याला शरण जा. मृत्यू जवळ आल्यावर डुकृञ् करणे घोकत राहिल्याने तुझे रक्षण होणार नाही.
।। इतिश्रीमद्शंकराचार्य
विरचितं चर्पटपंजरिका स्तोत्रम् संपूर्णम् ।।