मंगळवार, २२ ऑक्टोबर, २०१९

आजी आजोबा दिवस noon

आजी आजोबा दिवस
लेखक- अनिल अनंत वाकणकर,
रिलायन्स ग्रीन्स, मोटी खावडी,
जामनगर(गुजरात)
आज आर्याच्या शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन होते म्हणून गेलो होतो. शाळेचे नांव आहे, कोकीळाबेन धिरुभाई अंबानी विद्यामंदिर. रिलायन्स ग्रीन्स टाऊनशीप मध्ये असणाऱ्या या शाळेतील वेगळेपण आज जाणवले. आजचा दिवस येथे आजी आजोबा दिवस म्हणून साजरा केला जात होता. मुळात ही कल्पनाच खूप आकर्षक आहे. हम दो हमारे दोच्या जमान्यात मुलांना आजी आजोबांचे दर्शन मिळणे देखिल मुश्किल झाले आहे. याला कारण आम्हीच आहोत. पूर्वीसारखी एकत्र कुटूंब पध्दती जरी अस्तित्वात नसली तरी हल्ली मुले उच्चशिक्षित असतात. आरक्षणाच्या जमान्यात आपल्यातिल गुणांना वाव मिळावा म्हणून ती जिथे मिळेल तिथे नोकरी करायच्या मनस्थितीत असतात. त्यामुळे आजी आजोबा गावाकडे रहातात आणि मुले दूर कुठेतरी आपल्या नोकरीच्या ठिकाणी आपल्या मुलांसह रहातात. त्या ठिकाणी आजी आजोबांना जाता येतेच असे नाही. त्यामुळे नातवंडांना रोजच्या रोज आजी आजोबांना भेटता येत नाही, त्यांच्याशी खेळता येत नाही. त्यांच्याकडून गोष्टी ऐकता येत नाहीत.
या पार्श्वभूमिवर आजचा दिवस आजी आजोबा दिवस म्हणून साजरा करणे खूपच भावले. आजी आजोबा आणि नातवंडांचे नाते काही वेगळेच असते. आपल्याकडे पूर्वापार असे म्हटले जाते की, दूध ऊतू गेले तरी चालेल परंतु त्यावरची साय जाता कामा नये. साय गेली तर जास्त हळहळ लागते. नातवंडांचे नेहमीच हट्ट पुरवीले जातात. जे मुलांना देणे कटाक्षाने टाळले, ते नातवंडांच्या बाबतित होतेच असे नाही. मुलांच्या बाबतितला कठोरपणा नातवंडांच्या बाबतित औषधालाही शिल्लक रहात नाही. मागे एकदा मी पांडुरंगशास्त्री आठवले यांचे प्रवचन ऐकले होते. त्यात त्यांनी असे सांगितले होते की, आई वडिलांचे गुण त्यांच्या मुलांच्या ऐवजी त्यांच्या नातवंडांमध्ये उतरतात. त्यामुळे कदाचित असे होत असावे. 
रिलायन्स ग्रीन्स येथे नेहमीच जेष्ट नागरीकांना मान दिला जातो. आपल्या कर्मचाऱ्यांच्या वृध्द मातापित्यांकरीता येथे काही विशेष कार्यक्रमांचे देखिल आयोजन केले जाते. मागे अधिक महिन्यांत जेष्ट नागरीकांची खास सहल येथे आयोजित केली गेली होती. मातृ देवो भव! पितृ देवो भव! या वचनांची येथे आठवण ठेवली जाते. नवीन पिढीवर चांगले संस्कार व्हावेत, आपल्या आजी आजोबांच्या त्यागाची, त्यांच्या नातवंडांवरील प्रेमाची, ते करीत असलेल्या संस्कारांची ओळख व्हावी म्हणून आजचा दिवस आजी आजोबा दिवस म्हणून साजरा करीत असल्याचे शाळेच्या मुख्याध्यापकांनी आवर्जुन सांगितले.
आज साजरा केलेला कार्यक्रम अतिशय आखिव रेखीव होता. कार्यक्रमाचे संचालन देखिल पहिलीतल्या छोट्या मुलांनी केले होते. हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य. कार्यक्रमाची सुरुवात वक्रतुंड महाकाय..... या गणेश वंदनेने केली गेली, त्यानंतर याकुंदेन्दु तुषार हार धवला...... हा सरस्वतीचा ध्यान मंत्र सादर केला गेला. हे दोन्ही संस्कृत श्लोक देखिल पहिलीतल्या छोट्या मुलांनी अगदी स्वच्छ उच्चार करुन सादर केले. आपल्या आजी आजोबांकरीता सादर केलेले सर्वच कार्यक्रम खूप छान झाले. ते सादर करण्याकरीता मुलांनी, शिक्षकांनी आणि पालकांनी देखिल खूपच मेहनत घेतलेली दिसत होती. या पार्श्वभूमिवर आमचे पहिलीतले दिवस आठवले तर असे लक्षांत येते की, आम्ही साधे परक्या माणसांशी सुध्दा बोलायला घाबरायचो परंतु आज ही सर्व मुले हजारभर प्रेक्षकांच्या समोर न घाबरता, न लाजता बिनधास्तपणाने कार्यक्रम सादर करीत होती.
अशाप्रकारे या शाळेने केलेला सुरु केलेला उपक्रम स्तुत्य आहे, अभिनंदनिय आहे. सर्वच शाळांनी आपल्याकडे सुरु करावा असा आहे. या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून येथे जवळच असणाऱ्या वृध्दाश्रमातिल मंडळींना बोलावले होते.     

गुरुवार, २६ सप्टेंबर, २०१९

श्री आर्यादुर्गा महात्म्य - अध्याय १

।। श्री आर्यादुर्गा महात्म्य ।।
।। आर्यादुर्गा देवी - अध्याय १ ।।
स्कंद पुराणांत गोकर्ण महात्म्यमध्ये उत्तरखंडात
" श्री आर्यादुर्गा महात्म्य " वर्णन केले आहे .

श्री गणेशायनमः ॥ श्रीसरस्वत्यैनमः ॥ श्री गुरुभ्योनमः ॥
ॐ नमोजी गणनायका । सर्व सिद्धी यशसाधका ।
हेरंबा भक्त वरदायका । काव्यारंभीं तवचरणी ॥१॥
मग वंदिली वाग्देवता । संजीवनी ज्ञान सरिता ।
वीणाधारिणी विधि दुहिता । मयुरासना सरस्वती ॥२॥
गोकर्ण पुराणांतर्गत । उत्तर खंडविख्यात ।
त्यामाजीं रसाळ बहुन । आर्यादुर्गा महात्म्य एक ॥३॥
श्री आर्यादुर्गा देवीची कथा । त्यांत वर्णिली धीमंता ।
सूत सांगे ज्ञान दाता । राजा शतानिका प्रति ॥४॥
ऐकोनि शतानिकाची वाणी । परम हर्षला सूत मुनी ।
धन्य धन्य तुझी वाणी । जी भगवदप्रश्ने सादर ॥५॥
ऐकें अखंड चित्त देऊन । प्रकृति - पुरुष दोघेजण ।
नित्य दंपती असोन । शाश्वत अनुदिनी विलसती ॥६॥
अखिल चराचर सर्वत्र । त्या पासुनी घडलें विचित्र ।
पुरुष प्रकृतीशीं क्षण - मात्र । वियोग न घडे सर्वथा ॥७॥
एकरुपें करुन । दोघे वर्तती अनुदिन ।
त्यांच्या इच्छेने संपूर्ण । त्रैलोक्य जाहलें उत्पन्न ॥८॥
प्रकृती विना पुरुष न शोभे । पुरुषा विना प्रकृती न शोभे ।
राहूं न शके एकटा पुरुष । प्रकृती विना कदापीही ॥९॥
पुण्य श्लोका महाराजा । शत्रु मर्दना शतानिका ।
व्यापिले असे तिन्ही लोका । पुरुष सहायें प्रकृतीही ॥१०॥
विष्णू मायारुपी तेजस्विता । कैसी प्रगट झाली देवता ।
ही ऐशी कथा श्रवणितां । कल्याण होईल श्रवणिकांचें ॥११॥
एकेकाळीं प्रग्जोतिष नगरी । सिंधूद्वीप ऋषी संभवी ।
वेत्रावती स्त्री उदरीं । पुत्र झाला महा प्रतापी ॥१२॥
पुत्र शूर पराक्रमी । तया सामर्थे गदगदे भूमी ।
गाजला वृत्रासूर नामीं । प्राग्यजोतिष नगरांत ॥१३॥
तया बलवान शत्रुमर्दने स्थापियली । प्राग्यजोषि स्थळीं राजधानी ।
संपूर्ण भूंमंडळ जिंकोनी । चालता झाला स्वर्ग मार्गी ॥१४॥
जाउनी मेरु पर्वतावरी । तेथुनी जाता झाला स्वर्गावरी ।
करुनी चाल इंद्रावरी । जिंकियले तयासी ॥१५॥
करुनी युद्ध अग्री सवें । यम निरुती वरुणासवें ।
वायु कुबेरें रुद्रासवें । जिंकियलें सर्वांसी ॥१६॥
वृत्रासुरें स्वर्गं नगरी जिंकियली । सत्ता आपुली स्थापियली ।
करिता झाला महा बळी । कामें देवादि महर्षीचीं ॥१७॥
वृत्रासुर भयें देव - ऋषींनीं । जागा आपुली सोडुनी ।
गमन केलें सर्व मंडळीनी । ब्रह्मदेवाकडे सत्य लोकीं ॥१८॥
लीन होउनी ब्रह्मदेवाचे चरणीं । सांगते झाले आपुलीं गार्‍हाणी ।
वृत्रासुरें आम्हां सर्वां गांजुनीं । त्रास दिधला अतिशय ॥१९॥
आम्हां सर्वांचा तूं नाथ असतां । आम्हीं झालों अनाथ आतां ।
देऊनी आश्रय आम्हां समस्तां । रक्षी रक्षी देवाधिदेवा ॥२०॥
आम्ही आपुली जागा सोडुनी । असुरभयें काननी हिंडूनी ।
येते झाले जीव रक्षणी । ब्रह्मदेवा तुजलागीं ॥२१॥
ऐकूनि गार्‍हाणी तयांचीं । ब्रह्मदेवें पूजा केली नारायणाची ।
शंख , चक्र , गदा , पद्म हाती । ह्रदयीं शोभे श्री वत्स लांच्छन ॥२२॥
प्रार्थना करुनी श्रीविष्णूची । सांगितली करणी वृत्रासुराची ।
गांजिलें असे सर्व देवासी । रक्षी रक्षी तयांसी ॥२३॥
देवाधिदेव कमलनयन । वृत्रासुराची करणी ऐकून ।
अति रागें संतप्त होऊन । विचार करी वृत्रासुर मर्दनासी ॥२४॥
नेत्र गरागरा फिरवून । क्रोधें मुख भयंकर होऊन ।
त्यांतून प्रगटलें दिव्य तेज एक । बाहेर पडलें मुखांतून ॥२५॥
त्या नंतरें ब्रह्मादिदेव कपाळांतुनी । तैसेंचि तेज बाहेर येवोनी ।
सर्व तेजें एकवटोनी । तया प्रकाशें जग व्यापिलें ॥२६॥
ऐशा परी तेज एकवटलें । तयानें रुप आकारिलें ।
कन्यारुप हळु हळु दिसलें । आनंदित झाले सर्व देव ॥२७॥
शंभुतेजें मुख बनलें । यमातेजें केश विस्तारिले ।
विष्णू तेजें द्वौभुजा जाहले । स्तन जाहले चंद्र तेजें ॥२८॥
इन्द्र तेजें बनले पोट । वरुण तेजें जंघा आणि पौट ।
पृथ्वी तेजें कंबरट । पदें बनलीं ब्रह्म तेजें ॥२९॥
रवी तेजें पादांगुलें बनलीं । वसुतेजें हस्तांगुलें जाहलीं ।
कुबेर तेजें नासिका शोभलें । दंत पंक्ती बनल्या प्रजापती तेजें ॥३०॥
अग्नि तेजें नयने प्रकाशलीं द्वा सन्ध्यातेजें भुवया आकारिलीं ।
वायू तेजें कर्ण जहाले । सर्व देव ऋषी तेजें जाहली देवता ॥३१॥
तया देवीसी पाहून । भीतिग्रस्त देवादि समस्त जाण ।
हर्षले आनंदित होऊन । त्रैलोक्य आनंदित जहालें ॥३२॥
तया देवीस पाहतां होऊन प्रफुल्ल । रुद्र देवें दिला त्रिशूल ।
दिधलें विष्णूने चक्र उज्ज्वल । दिला ब्रह्मदेवे ब्रह्मदण्ड ॥३३॥
यमें दिधला दण्ड आकर्ष । वरुणें दिला आपुला पाश ।
वायूने दिलें धनुष्य । वज्र दिधलें इन्द्राने ॥३४॥
दिलें खडगास्त्र कालानें। शंख दिधला वरुणाने ।
हार आणि चूडामणी क्षीरसागराने । हिमालयें दिलें सिंहासन ॥३५॥
महाबली ऐरावतें घंटावाद्य दिलें । विश्वेदेवें मुकुट माळ केयूर दिले ।
सर्व देवें अमोल अलंकार दिले । दिलीं विपुल आयुधें ॥३६॥
अलंकारें मस्तकापासुनी पदकमलावरी आकाशमण्डळी अती शोभली ।
तियेनें गगन भेदी गर्जना केली । तेणें सर्व आकाश दुमदुमलें ॥३७॥
हलली पृथ्वी पर्वतादिक । तयागर्जने भ्याले भूतळी लोक ।
जय जयकार करुनी देवादिक । स्तुती करुं लागले तियेची ॥३८॥
आम्हां सर्वांची जननी तूं । स्वभावें आम्हां सर्वां व्यापिसी तूं ।
स्वाहा आणि स्वधाही अससी तूं । एकार क्रिया शक्ति अससी तूं ॥३९॥
असे भव्य कराल तूंची । श्री लक्ष्मी आणि पुष्टि असे तूंच ।
सरस्वती लज्जा कीर्ती ही तूंची । आम्हा सर्वांचा आनन्द असे तूंची ॥४०॥
प्रभा आणि श्रुति अससी तूं । दम इन्द्रिय निग्रह तूं ।
बुद्धी सिद्धी अससी तूं । तूंची असे अहंकाररुपी ॥४१॥
र्‍हीं बीज नि मधु नाशकर्ती तूं । ब्रह्मा विष्णु महेशी वास करणारी तूं ।
सर्वां व्यापक देवता तूं । वेद गर्भ दिती तूची असे ॥४२॥
येऊनी अशा सर्वांचे अंगातुनी । शक्ति संभवे रुप धरुनी ।
तुजशी जिंकू न शके कोणी। म्हणोनि तुझें नाम असे दुर्गादेवी ॥४३॥
।। इति श्री गोकर्ण पुराणे उत्तर खण्डे
श्री आर्यादुर्गा महात्म्य
दुर्गा प्रादुर्भवो नाम प्रथमोध्यायः ।।

श्री आर्यादुर्गा देवी महात्म्य अध्याय २

।। श्री आर्यादुर्गा देवी महात्म्य ।।
।। आर्यादुर्गा देवी - अध्याय २ ।।
श्री देवी दुर्गा होउनी उपजली । तिने अदभुत गर्जना केली ।
सर्व मण्डळी भयें थरारली । वृत्रासुर मनी दचकला ॥१॥
वृत्रासुर चालला गर्जना ऐकून । काय असें तें घ्यावया जाणून ।
देवीचें दिव्य रुप पाहून । चकित झाला ते समयी ॥२॥
सहस्त्र हात दिसले आकाशीं । व्यापिलें रुप दशदिशीं ।
जगीं प्रकाशलें दिव्य प्रकाशीं । ऐसें रुप पाहिलें वृत्रासुरें ॥३॥
युगांतर समयासी । अग्नी जैसा नाशकरी ।
तैशापरी वृत्रासुरे । चाल केली दुर्गेवरी ॥४॥
सांगता झाला शतनिका प्रति सूत । दुर्गादेवी वृत्तासुरे युद्ध अदभुत ।
सैन्य जहालें भयचकित । युद्ध समयीं तये स्थळीं ॥५॥
ऐशापरि युद्ध आरंभिले । दूर्गेने अति सैन्य संहारिलें ॥
शस्त्रास्त्रें युद्ध कडाडलें ॥ पर्जन्य पडला शस्त्रांचा ॥६॥
असुरास्त्रांचा चुरा करुन । अतिहर्षे हास्य करुन ।
तया हसें आकाश भरुन । सर्व भूमी गडाडली ॥७॥
तिच्या हसें मुखांतून । घोरमुखी बहुत देवी उदभवून ।
असुर सैन्या धरुन । खाऊं लागल्या चरचरां ॥८॥
सैन्य नाश झाल्याचें पाहून । सेनापती विहसें अवलोकून ।
मनी अती क्रुद्ध होऊन । तुटून पडला दुर्गादेवीवरी ॥९॥
भद्रकाली देवीने ऐसें जाणून । विहस्ताचें केश धरुन ।
सुदर्शन चक्र तयावरी चालवून । धडावेगळें केलें तया ॥१०॥
महापराक्रमी सेनापती मरतां । दुर्गादेवीने असें जाणतां ।
चतुरंग सैन्य हळु हळू कापतां । सर्व सैन्यासी मारिलें ॥११॥
सर्वा नंद कर्ती सर्व सैन्यातें मारुन । वृत्रासुरावरी गेली चाल करुन ।
ऐशा महादेवीला वृत्रासुरें पाहून । क्रुद्ध झाला तो ते समयीं ॥१२॥
ऐसें दृश्य तयें पाहिलें । वज्रा सम अस्त्र देवी वरी सोडिले ।
दुर्गेनेही तैसेंचि अस्त्र सोडिलें। वर्षाव केला बाणांचा ॥१३॥
दुर्गादेवीचे वृत्रासुराबरोबर । युद्ध चाललें महा भयंकर ।
तैसेंची राहिलें वर्ष शंभर । हरलें नाहीं कोणी ही ॥१४॥
अंती सर्व शक्ती एक वटून। वृत्रासुराच्या केशांसी धरुन ।
धरणीवरी तया पाडून । शूलें आणि खडगें मारिलें ॥१५॥
ऐशापरी वेत्रवती सुता मारिलें । शीर केलें धडावेगळें ।
तें वृत्त ब्रह्मादिदेवां कळलें । सर्व आले तये स्थळी ॥१६॥
तें दृश्य सर्वानी पाहिलें । आणि दुर्गा देवीची स्तुती करुं लागले ।
गुरु सम ब्रह्मदेवें सांगितलें । दुर्गादेवीसी तये वेळीं ॥१७॥
जय जय दुर्गे माय भवानी । तूचि अससी त्रिकाल ज्ञानी ।
तुझी निंदा न करी कोणी । रक्षणकर्ती तूं आम्हां ॥१८॥
आम्हां सर्वां हांके तूं आलीस धावून । राहे आतां हिमगिरी वरी जाऊन ।
शत श्रृंग पर्वतावरी वास करुन । मर्दन करी तिथलिया राक्षसांचें ॥१९॥
त्या हिमालय पर्वतावर । वास करतील क्रूर असूर ।
नाम तयाचें शुभ - निशुंभासुर । त्रास देतील सर्व लोकां ॥२०॥
महिषासुर नामक दैत्य । सर्वांसी दुःख देयील बहुत ।
तपोबलें होतील समर्थ । मदोन्मत्त दुरात्मे ॥२१॥
त्या सर्वांतें मृत्युरुपें । तूंचि वधिशील साक्षेपें ।
या कारणी सुखरुपें । राहे माते त्यास्थळीं ॥२२॥
ऐशा परी ब्रह्मदेवाची विनंती ऐकून । सांगती झाली दुर्गादेवी तिथें मी राहीन । ऐसें ब्रह्मदेवासीं सांगून । निघती झाली सर्व देवींसह ॥२३॥
मग तिथुनी शतश्रृंग पर्वती गेली । सर्व देवीं सह तिथें तप करुं लागली । ऐशापरी ती राहे ज्या स्थळीं । तयाचें नाम असे प्रसिद्ध अजश्रृंग ॥२४॥
पक्षराज गरुडें तेंचि अजश्रृंग शिखर । गोकर्णी न्यावया घेवुनी आपुल्या पाठीवर । उड्डाण करितां पक्ष राजेश्वर । शिखर पडलें सागरीं ॥२५॥
दुर्गा देवी अजश्रृंगावरी राहिल्यावरुन । नांव पडलें तियेसी आर्या जाण । मग म्हणूं लागले सर्वहिजन । श्री आर्या - दुर्गादेवी तियेसी ॥२६॥
।। इति श्री गोकर्ण पुराणे उत्तर खंडे
श्री आर्यादुर्गा देवी महात्म्य
वृत्रासुर वधो नाम द्वितीयोध्यायः ।।

श्री आर्यादुर्गा महात्म्य अध्याय ३

 श्री आर्यादुर्गा महात्म्य "
अध्याय ३


म्हणे शतानिकाप्रति संवर्तक । महिषासुर नामें दैत्य एक ।
महा बलिष्ट असुनी प्रख्यात । राज्य करिता झाला शोणितपुरी ॥१॥
कैकवर्षे तपश्चर्या करुनी । ब्रह्म देवासि घेतला प्रसन्न करोनी ।
वर मिळविला तया कडूनी । देव गंधर्व मनुष्या हातीं मृत्यू न ये ॥२॥
घेउनी आपुल्या चतुरंग सैन्यासी । स्वारी करुनी तिन्ही लोकांसी ।
छळुनी देव गन्धर्व मनुष्यांसी । नाना परी त्रास देता झाला सर्वांसी ॥३॥
महिषासुर मन्त्री धूम्रकेतू नाम्नौ । फिरत असतां एकेदिनीं ।
तया भेटतां नारदमुनी । नमस्कार करिता झाला तयासी ॥४॥
विचारी नारदमुनीसी प्रश्न करुन । काय पाहिलें जगीं नवीन ।
सांगावें मजला आपण । सर्वज्ञानी नारदमुने ॥५॥
धूम्रकेतूसी सांगे नारदमुनी । महिषासुरासम जगीं नसे कोणी ।
तयाचे राज्यीं काय असे कमी । त्रैलोकीं शूर असे एक तोची ॥६॥
पुरुषार्थि महिषासुर असे जगतीं । त्रैलोक्य रक्षक तयासी म्हणती ।
इन्द्रादि लोकपाल त्याचे दासदासी । कोण विरोध करी तयासी ॥७॥
तया राज्यांतील नागरिक आम्हीं । म्हणोनी सांगतों तुज एक बातमी ।
पाहिलें असें रत्न एक मी । महिषा सुरासी योग्य तें ॥८॥
गोकर्ण क्षेत्राजवळी असती । आर्याद्विप नाम तया म्हणती ।
तया स्थळी जियेची वसती । तेंची स्त्री रत्न सुंदर असे ॥९॥
तियेचें आर्यादुर्गा नाम । वध केला वृत्रासुराचा जाण ।
ती म्हणे मजसम जगीं नसे कोण । ऐशा परी ती आहे जाण ॥१०॥
नारदाचें उत्तर ऐकून । गेला महिषासुराजवळी धांवून ।
धूम्रकेतूसी येतां पाहून । आनंद झाला महिषासुरासी ॥११॥
धुम्रकेतूचें वदन पाहून । तू काय पाहिलें असे नवीन ।
सांगावें मज कथन करुन । विचारता जाहला महिषासुर ॥१२॥
धूम्रकेतु सांगे कर जोडून। असे एक सुन्दर रत्न ।
ह्या सिंहासनासि दिसेल शोभून । सांगितलें असे नारद ऋषींनीं ॥१३॥
तयाचे ते बोल ऐकून । महिषासुर म्हणे धूम्रकेतु लागून ।
सांगावें मज स्पष्ट करुन । कैसें रत्न कुठें असे तें ॥१४॥
ऐकतां वृत्त विस्तारुन । म्हणे धूम्रकेतु लागून ।
तुवां तेथें त्वरित जावून । आणावें येथें तये सुन्दरीसी ॥१५॥
मजसाठीं तिकडे जाऊन । सत्वर यावें दुर्गेसी घेऊन ।
तिजसवें विवाह करुन । मी आनंदित होऊं इच्छितों ॥१६॥
म्हणें धूम्रकेतूसि जाण । चतुरंग सेना सवें घेऊन ।
शीघ्रची जावें न लागतां क्षण । आर्याद्वीपासीजाणपां ॥१७॥
सैन्य मोठें सवें घेऊन । मन्त्री धूम्रकेतू नीतिज्ञ ॥
आर्याद्वीपावरी जाऊन सैन्य ठेविलें समुद्र तिरीं ॥१८॥
आर्या द्वीपीं मग जाऊन ॥ रत्न जडित नजराणा घेऊन ।
आर्यादुर्गा देवीसमोर ठेऊन । नमस्कार केला तियेषी ॥१९॥
धूम्रकेतूनें नमस्कार करितां । देवी सांगे तया बैस आतां ।
ऐसें तियेचें वचन ऐकतां । उठूनीं बसला धूम्रकेतू ॥२०॥
तये स्थळीं स्वस्थ बैसून । तिजसी पाहतां न्याहाळून ।
महिषासुरासी योग्य असे असें मानून । हलविता जाहला आपुलें शिर ॥३१॥
देवीने धूम्रकेतूचें मस्तक पाहिलें । विचारती झाली तूं कोण कां येणें झालें । आणि आतां शिर कां हलविलें । सांग मजला तूं आतां ॥२२॥
करितां प्रश्न आर्यादुर्गेने । धूम्रकेतू सांगता झाला नम्रपणें ।
मी मंत्री धूम्रकेतू नामे । दानवेंद्र महिषासुराचा ॥२३॥
ज्याने भू लोक जिंकिलें । तैसेचि स्वर्गलोक जिंकिले ।
तयाने मज आज्ञापिलें । तुला घेउनी यायला ॥२४॥
तूंचि असे अती रुपवती । तुझी असे अती मनोहर दृष्टी ।
तुला पाहतां मम चित्ती । विचार आला तुजविषयीं ॥२५॥
तूंची सुंदर ऐसे पाहूनी । महिषासुरासी तूं योग्य असें मानूनी ।
तोचि तुजला योग्य असें येतां मनी । हललें मस्तक माझे ॥२६॥
तुझें नाम काय आणि कोण । तूंचि असे कुणा स्वाधिन ।
पुण्यराशी तूं वाटते जाण । सांग मजला सत्वर तूं ॥२७॥
महिषासुर जरी असे तेथें । तरी त्याचें मन असे येथें।।
यास्तव तूं यावें मज सवें तेथें । तया राजा पहावया ॥२८॥
ज्याची सेवा केली देव पत्नीनीं । तयाचे राजधानीं येऊनी ।
तयांचे ऐश्वर्य भोगावें तुम्ही । ऐसें वदतां देवी हंसली ॥२९॥
दुर्गादेवी म्हणें धूम्रकेतूसी । मी येईन त्याचे राजधानीसी ।
परी अटी असे एक येण्यासी । तें मान्य करणें भाग असे ॥३०॥
देवासुरादिकांनी केली मला मागणी । ते असे सुंदर बलिष्ट आणि सदगुणी ।
परी मम अट पुरी करुं शकले नाही कोणी । म्हणोनियां गेले परतोनी ॥३१॥
अट असे जो मज सवें युद्ध करुनी । जिंकेल मजला युद्धांत जो कोणी । तयाची होईन मी धर्म पत्नी । त्याचे बरोबरी येईन मी ॥३२॥
जरी मी यावें महिषासुराचे घरीं । तरीं त्याने यावें लढण्यासी मजबरोबरी । बोलावून आणावें त्यासी येथ सत्वरी । जावून सांगावें तूंची लवकरी ॥३३॥
क्रोधें धूम्रकेतू म्हणे आर्यादुर्गेसी । ऐसें न शोभे तुज स्त्रियेसी ।
तो असे महापराक्रमी जगतासी । तूंची स्त्री अबला अससी ॥३४॥
त्रैलोकीं तोची शस्त्र धारी जाण । अस्त्र विद्येंत ही सर्वांत निपुण ।
दिसे सर्वांत सुंदर रुपवान । तरी तूं वरावें त्यासी सत्वरीं जाण ॥३५॥
जरी तूं येत नसशील मजबरोबर । तरी केशांसी धरुनी नेईन सत्वर ।
ऐसें म्हणोनी पुढें जहाला झरझर । तिला ओढूनी न्यावयासी ॥३५॥
धूम्रकेतू पुढें होऊन । न्यावया तिला केशांसी धरुन ।
ऐसें दृश्य जवळून । देवीच्या दासीने पाहिलें ॥३७॥
तांबूल दायिनी दासीने पाहतां । तलवार घेतली आपुल्या हातां ।
वार केला उचलोनी त्वरितां । धडावेगळें केलें तया ॥३८॥
धूम्रकेतूसी दासीनें मारिलें । तें दृश्य भूतनाथानें पाहिलें ।
आणि त्याच्या सैन्यासी घेरुनी । धरिलें फडशा केला सर्व सैन्याचा ॥३९॥
भूतनाथा हातून जे कोणी निसटले । ते महिषासुराजवळी आले ।
त्यानीं वर्तमान सांगितले । यथासांग सर्वही ॥४०॥
धूम्रकेतु दुर्गेसी आणील म्हणून । पण घडलें दुसरेंचि वर्तमान ।
धुम्रकेतूसी मारल्याचें वृत्त ऐकून महिषासुर संतप्त जहाला मनी ॥४१॥
मग विचार करुनी आपुल्या मानसी । तयाने चंड -मुंड सेनापतींसी ।
सैन्य देऊनी त्यांच्या पाठीशीं आर्याद्वीपीं पाठविलें ॥४२॥
शस्त्रास्त्रें घेऊनि आपुल्या बरोबर । जाउनि चंड -मूंड आर्या द्वीपावर ।
आव्हान केलें युद्धासी आपुल्याबरोबर । तया आर्यादुर्गा देवीसी ॥४३॥
बहुमुख अलंकृत देवीने ते पाहून । अनेक हस्तीं विपुल शस्त्रास्त्रें घेऊन । त्याजबरोबरी प्रचंड युद्ध करुन । सर्व सैन्यासह तया दोघां मारिलें ॥४४॥
जे कोणी असुर पळुनि गेले । ते महिषासुराजवळी आले ।
त्यांनी तेथील वृत्त सांगितलें । जैसें घडलें तैसेंचि ॥४५॥
वृत्त कळतां क्रुद्ध होउनी महिषासुर । रथी महारथी यज्ञघ्न शुंभ -निशुंभासुर । निशढ शढबाल चतुर्मुख सत्वर । निघाले हविर्भागीं जे पोशिले ॥४६॥
सैन्यासह सर्व रथी महारथी । देवीने पाठविले यमपंथी ।
जे कोणी पळले दुष्टमती । महिषासुराजवळी धावूनी आले ॥४७॥
मग पाठविला रक्तासुर । आरंभिलें त्याने युद्ध गंभीर ।
बसतां वार रक्तासुरावर । रक्त सांडलें अतिशय ॥४८॥
रक्तबिंदू पासूनि बनले राक्षस । पाहुनि हंसली आर्यादुर्गा त्यांस ।
मुखांतुनि प्रगटली करितां हास्य । लंबोदर महाकाली त्या समयीं ॥४९॥
प्रगटतां तियेसी आज्ञा केली । करितां आज्ञा अग्नि जिव्हा महाकाली ।
उदभवित राक्षसापासीं जाऊं लागली । आणि सर्व राक्षसां गिळंकृत केलें ॥५०॥
महाबली रक्तासुराला । तीक्ष्ण खडगीं मारुनी टाकिला ।
प्राशुनी तयाच्या रक्ताला । रक्तासुराचा नाश केला ॥५१॥
हें वृत्त महिषासुरासी कळल्यावर । संतप्त झालें त्याचें शिर ।
ती देवी माझ्या हातूनि मरणार । ऐसें म्हणोनि ऊठिला ॥५२॥
ऐशापरि योजुनी महिषासुर । घेऊनि सर्व सैन्य बरोबर ।
चाल करुनि आला आर्याद्वीपावर । लढण्यासि आर्यादुर्गा देवी बरोबर ॥५३॥
बसलीं होती देवी आपुल्या सिंहासनावर । अंगावरी घालुनी सर्वहि अलंकार । कमलनयना बहुत सुंदर । आर्यादुर्गा देवी तयावेळीं ॥५४॥
महिषासुरें केलें अंगी कवचालंकार धारण । एके हातीं धनुष्य दुसरे हाती बाण । घेउनी बसला होता आपुल्या रथावरी जाण । तये वेळीं दिसे महिषासुराचें वज्र ठाण ॥५५॥
ऐसे परि हातीं धनुष्य बाण घेऊनि । आकर्ण परियंत बाण ओढुनी ।
तीक्ष्ण बाण सोडितसे हें देवीने पाहूनी । आपुल्या प्रखर बाणे मध्येंचि टाकी छेदून ॥५६॥
देवीस पाहुनी महिषासुर । बाण वर्षाव करी भयंकर ।
तये परि देवीनेहि असुरावर । सोडियले बाणवर्षाव अपार ॥५७॥
युद्ध शुरु झालें अती घोर । सोडुं लागला बाण देवीवर ।
मोडूनी ठाकले बाण चरचर । आर्यादुर्गेने तत्समयीं ॥५८॥
जीं जीं शस्त्रास्त्रें महिषासुर सोडी । तीं तीं सर्वही आर्यादुर्गा मोडी ।
ऐशापरी जाणुन युद्ध नाडी । रथ त्याचा मोडियला ॥५९॥
मग बैसला ऐरावत सम हत्तीवर । सोडूं लागला अस्त्रें अपरंपार ।
तीं सर्वही मोडूनी सत्वर । हतबल केला तयासी ॥६०॥
उड्डाण करुनी सिंहे क्रुर । उडी घेतली तया हत्तीवर ।
तीक्ष्ण दाढें फाडुनी सत्वर । मारुनी टाकिला धरणीवरी ॥६१॥
मग महिषासुर पायींच येतां । देवीने घेउनी त्रिशूल हातां ।
मारुनी टाकिला महिषासुरासी तत्वतां । सैन्य सर्वही मारिलें ॥६२॥
त्रैलोकीं भयदाता महिषासुर । आर्यादुर्गेने मारुनी टाकिल्यावर ।
आकाशांतुनी पुष्पवृष्टी करुन तिजवर । सर्वहि देवानी केली स्तुती तियेची ॥६३॥
ज्या ज्या कारणी उदभवली आर्यादुर्गा देवता। तेंतें सर्व ही कार्य संपलेंसे जाणतां।
आशीर्वाद देउनी समस्तां । गुप्त झाली ती सर्व देवींसह ॥६४॥
।। इति श्री गोकर्ण पुराणे उत्तर खंडे
श्री आर्यादुर्गा देवी महात्म्ये महिषसुरवधो नाम तृतियोध्याय: ।।

आर्या दुर्गा आरती

।। दुर्गाया: आर्तिक्यम् ।।
चतुरानन भयहारिणि भो वरदे दुर्गे । दुर्धरदुर्गतिहारिणि बोधित गोविंदे ।।
तवपदकमले वंदे श्रितनित्यानंदे । वंदितमुनिवरवृंदे श्रेयोमकरंदे ।।१।।
जयदेवि जयदेवि मधुकैटमथिनि । जगदुदयस्थितिसंह्रति-संसृति-भिशमने ।।धृ।।
हरिमुखतेजोभि: प्रकटित निजदेहे । समरोचित शुभलक्षण-शुषमा संदोहे ।।
नानायुधविलसत्करदलितासुरनिवहे । स्वीयप्रेक्षणजनितद्योसद्रिपुमोहे ।।२।।
जयदेवि जयदेवि महिषासुरमथिनि । जगदुदयस्थितिसंह्रति-संसृति-भिशमने ।।धृ।।
चामरमुखदैत्यवरप्रविनाशिनि मरुताम् । संस्तवतुष्टेभगवति शुभकारिणि जगताम्।
शुंभादिप्रतिभटविद्धंसिनि भो जगताम् । त्वङ्घ्रिकमले चेतोभृङ्गोSयं रमताम्।।३।।
जयदेवि जयदेवि शुंभासुरमथिनि । जगदुदयस्थितिसंह्रति-संसृति-भिशमने ।।धृ।।
सिंहासनसंशोभिनि विधुशेखरकान्ते । काञ्च़ीकङ्कणनूपुर मणिभूषणललिते ।।
मयिकुरु करुणामनिशं विधिहर-शक्रनुते । नीराजन मुररीकुरु काशीविप्रनुते ।।४।। जयदेवि जयदेवि निखिलासुरमथिनि । जगदुदयस्थितिसंह्रतिसंसृतिभिशमने ।।धृ।।
(श्री आर्यादुर्गा(देवी हंसोळ) सेवा संघ, पुणे यांच्या सौजन्याने)

श्री आर्यादुर्गाष्टक

।। श्री आर्यादुर्गाष्टक ।।
आर्यादुर्गे देवी । निज भक्ता शांति सुख सदा देई ।।
इह पर शत्रू शमवुनि । निज सुख दे पाप तें लया नेई ।।१।।
आर्यांच्या विनंतीने । प्रगटुनिया देवकार्य का केलें ।।
सर्व जना तोषवुनि । वेत्रातें सबलही लया नेले ।।२।।
शिशु दु:खा अवलोकुनि । जननी धावूनि उचलुनि धरिते ।।
त्यापरि भक्ता संकटि । आर्यादुर्गा प्रशस्त ते करिते ।।३।।
अरिवर्गा नासुनिया । भक्ता सांभाळण्या सदा पावे ।।
देवांनाहि जड असे । कार्य करूनि सज्जना सदा पावे ।।४।।
भक्तांलागि वरदा । कलियुगी दुसरी नसे असें वदती ।।
म्हणवूनि शरण आलो । तव चरणासी असो सदा प्रणति ।।५।।
जे महिषासुर दुर्मद । शुंभ निशुंभादि मातले फार ।।
त्या सर्वाते निपटुनि । केला लोकांत भक्त उद्धार ।।६।।
भू भाराते वारी । दावी भक्तांसि आपुला महिमा ।।
ब्रह्मादिक तुज स्तविती । लोकीं विसरुनि आपुली गरिमा।।७।।
आर्यादुर्गा वरदाष्टक हें । गाईल भक्त जो नित्य ।
त्याचे अनिष्ट जाऊनि । ह्रदयी उगवेल ज्ञान आदित्य ।।८।।
(श्री आर्यादुर्गा(देवी हंसोळ) सेवा संघ, पुणे यांच्या सौजन्याने)

श्री आर्यादुर्गा महात्म्य अध्याय ४

।। श्री आर्यादुर्गा महात्म्य ।।
।। आर्यादुर्गा देवी - अध्याय ४ ।।

सर्व राक्षसांचा संहार करुन । आर्यादुर्गा देवी गुप्त होऊन ।
हें दृश्य सर्वांनी पाहून । आनंदले सर्व ऋषि -जन ॥१॥
उपरी सर्व देव -ऋषींनी । आर्यादुर्गेची प्रतिमा करोनी ।
यथाविधी मंत्रोच्चार करोनी । स्थापियली आर्याद्वीपावर ॥२॥
अकरा तीर्थे असती तेथ । नामें तयाचीं असती विख्यात ।
जे जे करिती स्नान तयांत । पावन होती तत्काळ ॥३॥
सर्व तीर्थात स्नान करोनि । पूजिली आर्यादुर्गा देवी सर्वांनी ।
मग गेले आपआपुल्या स्थानीं । निर्भयें सर्व देव -ऋषि जन आनंदुनी ॥४॥
वसुधारा तीर्थ तीर्थ गंगाधर । महिषतीर्थ आणि कालीधर ।
गौरीहद तीर्थ आणि कौमार । नाग तीर्थ आणि चामुंडा तीर्थ ॥५॥
वारुणा तीर्थ आणि वरुण तीर्थ । ऐशी असती तीर्थे दहा जाण ।
आणि असे एक तीर्थ महान । दुर्गा तीर्थ नामें मुख्य तें ॥६॥
दश तीर्थे सहस्त्र तीर्थांसमान । त्यांत शुद्धोदक दुर्गातीर्थ जाण ।
आणि तया तीर्थात करितां स्नान । होतील सर्वही पावन ॥७॥
जे करतील नित्य तीर्थांत स्नान । तैसेंचि दुर्गामहात्म्याचें पठण ।
शुद्ध अंतःकरणें करतील जाण । एक वर्षांत होइल देवी त्याला प्रसन्न ॥८॥
।। इति श्री गोकर्ण पुराणे उत्तर खंडे
श्री आर्यादुर्गा महात्म्ये चतुर्थोध्याय समाप्त ।।
।। श्री जगदंबा आर्यादुर्गार्पणमस्तु ।।
हें महात्म्य दामोदर प्रभु देसाई याने रचिलें ।
तें अनंत प्रभु देसाई याने यथामति परिशोधिलें ।
आणि तें भक्तजनांनी प्रेमें गायिलें ।
श्री जगदंबा श्री आर्यादुर्गा देवीचें ॥१॥
यांत काय न्युनाधिक असतां ।
भक्तगण नि वाचक तत्वतां ।
हंसक्षीर न्यायें निवडूनि घेतां ।
गोड मानून घेतील सकल जनता ॥२॥

देवीची १०८ शक्तीपीठे

देवीची १०८ शक्तीपीठे प्रसिद्ध आहेत. स्कन्दपुराणातिल अवन्तीखण्डामधील रेवा खण्डातील अध्यायः १९८ मध्ये हे देवी स्तोत्र आहे यात देवीची १०८ पीठे सांगितली आहेत. दक्ष-प्रजापतीच्या यज्ञामध्ये सती पितृगृही जाण्यास निघाली तेव्हा शंकरांना तिच्यापुढे काय वाढून ठेवले आहे, याची कल्पना होतीच. ते द्रष्टे होते आणि म्हणूनच तेथे न जाण्याचा त्यांनी तिला उपदेश केला; पण तिने तो मानला नाही. आपली पत्नी पुन्हा दिसणार नाही, या जाणिवेने शंकरांनी तिला प्रश्‍न केला, की "यदाकदाचित काही विपरीत घडले तर तुला मी कोठे पाहावे? ते सांगितल्यास मला आनंद वाटेल.' त्यावर तिने आपली वसतिस्थाने सांगितली, ती खालीलप्रमाणे –
श्रीदेव्युवाच -
सर्वगा सर्वभूतेषु द्रष्टव्या सर्वतो भुवि ।
सर्वलोकेषु यत्किंचिद्विहितं न मया विना ॥ १९८.६२ ॥
तथापि येषु स्थानेषु द्रष्टव्या सिद्धिमीप्सुभिः ।
स्मर्तव्या भूतिकामेन तानि वक्ष्यामि तत्त्वतः ॥ १९८.६३ ॥
वाराणस्यां विशालाक्षी नैमिषे लिङ्गधारिणी ।
प्रयागे ललिता देवी कामुका गन्धमादने ॥ १९८.६४ ॥
मानसे कुमुदा नाम विश्वकाया तथाऽपरे ।
गोमन्ते गोमती नाम मन्दरे कामचारिणी ॥ १९८.६५ ॥
मदोत्कटा चैत्ररथे हयन्ती हास्तिने पुरे ।
कान्यकुब्जे स्थिता गौरी रम्भा ह्यमलपर्वते ॥ १९८.६६ ॥
एकाम्रके कीर्तिमती विश्वां विश्वेश्वरे विदुः ।
पुष्करे पुरुहूता च केदारे मार्गदायिनी ॥ १९८.६७ ॥
नन्दा हिमवतः प्रस्थे गोकर्णे भद्रकर्णिका ।
स्थानेश्वरे भवानी तु बिल्वके बिल्वपत्त्रिका ॥ १९८.६८ ॥
श्रीशैले माधवी नाम भद्रे भद्रेश्वरीति च ।
जया वराहशैले तु कमला कमलालये ॥ १९८.६९ ॥
रुद्रकोट्यां तु कल्याणी काली कालञ्जरे तथा ।
महालिङ्गे तु कपिला माकोटे मुकुटेश्वरी ॥ १९८.७० ॥
शालिग्रामे महादेवी शिवलिङ्गे जलप्रिया ।
मायापुर्यां कुमारी तु संताने ललिता तथा ॥ १९८.७१ ॥
उत्पलाक्षी सहस्राक्षे हिरण्याक्षे महोत्पला ।
गयायां विमला नाम मङ्गला पुरुषोत्तमे ॥ १९८.७२ ॥
विपाशायाममोघाक्षी पाटला पुण्ड्रवर्धने ।
नारायणी सुपार्श्वे तु त्रिकूटे भद्रसुन्दरी ॥ १९८.७३ ॥
विपुले विपुला नाम कल्याणी मलयाचले ।
कोटवी कोटितीर्थेषु सुगन्धा गन्धमादने ॥ १९८.७४ ॥
गोदाश्रमे त्रिसन्ध्या तु गङ्गाद्वारे रतिप्रिया ।
शिवचण्डे सभानन्दा नन्दिनी देविकातटे ॥ १९८.७५ ॥
रुक्मिणी द्वारवत्यां तु राधा वृन्दावने वने ।
देवकी मथुरायां तु पाताले परमेश्वरी ॥ १९८.७६ ॥
चित्रकूटे तथा सीता विन्ध्ये विन्ध्यनिवासिनी ।
सह्याद्रावेकवीरा तु हरिश्चन्द्रे तु चण्डिका ॥ १९८.७७ ॥
रमणा रामतीर्थे तु यमुनायां मृगावती ।
करवीरे महालक्ष्मी रूपादेवी विनायके ॥ १९८.७८ ॥
आरोग्या वैद्यनाथे तु महाकाले महेश्वरी ।
अभयेत्युष्णतीर्थे तु मृगी वा विन्ध्यकन्दरे ॥ १९८.७९ ॥
माण्डव्ये माण्डुकी नाम स्वाहा माहेश्वरे पुरे ।
छागलिङ्गे प्रचण्डा तु चण्डिकामरकण्टके ॥ १९८.८० ॥
सोमेश्वरे वरारोहा प्रभासे पुष्करावती ।
वेदमाता सरस्वत्यां पारा पारातटे मुने ॥ १९८.८१ ॥
महालये महाभागा पयोष्ण्यां पिङ्गलेश्वरी ।
सिंहिका कृतशौचे तु कर्तिके चैव शांकरी ॥ १९८.८२ ॥
उत्पलावर्तके लोला सुभद्रा शोणसङ्गमे ।
मता सिद्धवटे लक्ष्मीस्तरंगा भारताश्रमे ॥ १९८.८३ ॥
जालन्धरे विश्वमुखी तारा किष्किन्धपर्वते ।
देवदारुवने पुष्टिर्मेधा काश्मीरमण्डले ॥ १९८.८४ ॥
भीमादेवी हिमाद्रौ तु पुष्टिर्वस्त्रेश्वरे तथा ।
कपालमोचने शुद्धिर्माता कायावरोहणे ॥ १९८.८५ ॥
शङ्खोद्धारे ध्वनिर्नाम धृतिः पिण्डारके तथा ।
काला तु चन्द्रभागायामच्छोदे शक्तिधारिणी ॥ १९८.८६ ॥
वेणायाममृता नाम बदर्यामुर्वशी तथा ।
ओषधी चोत्तरकुरौ कुशद्वीपे कुशोदका ॥ १९८.८७ ॥
मन्मथा हेमकूटे तु कुमुदे सत्यवादिनी ।
अश्वत्थे वन्दिनीका तु निधिर्वैश्रवणालये ॥ १९८.८८ ॥
गायत्री वेदवदने पार्वती शिवसन्निधौ ।
देवलोके तथेन्द्राणी ब्रह्मास्ये तु सरस्वती ॥ १९८.८९ ॥
सूर्यबिम्बे प्रभा नाम मात्ःणां वैष्णवी मता ।
अरुन्धती सतीनां तु रामासु च तिलोत्तमा ॥ १९८.९० ॥
चित्रे ब्रह्मकला नाम शक्तिः सर्वशरीरिणाम् ।
शूलेश्वरी भृगुक्षेत्रे भृगौ सौभाग्यसुन्दरी ॥ १९८.९१ ॥
एतदुद्देशतः प्रोक्तं नामाष्टशतमुत्तमम् ।
अष्टोत्तरं च तीर्थानां शतमेतदुदाहृतम् ॥ १९८.९२ ॥
इदमेव परं विप्र सर्वेषां तु भविष्यति ।
पठत्यष्टोत्तरशतं नाम्नां यः शिवसन्निधौ ॥ १९८.९३ ॥
स मुच्यते नरः पापैः प्राप्नोति स्त्रियमीप्सिताम् ।
स्नात्वा नारी तृतीयायां मां समभ्यर्च्य भक्तितः ॥ १९८.९४ ॥
न सा स्याद्दुःखिनी जातु मत्प्रभावान्नरोत्तम ।
नित्यं मद्दर्शने नारी नियताया भविष्यति ॥ १९८.९५ ॥
पतिपुत्रकृतं दुःखं न सा प्राप्स्यति कर्हिचित् ।
मदालये तु या नारी तुलापुरुषसंज्ञितम् ॥ १९८.९६ ॥
सम्पूज्य मण्डयेद्देवांल्लोकपालांश्च साग्निकान् ।
सपत्नीकान्द्विजान्पूज्य वासोभिर्भूषणैस्तथा ॥ १९८.९७ ॥
भूतेभ्यस्तु बलिं दद्यादृत्विग्भिः सह देशिकः ।
ततः प्रदक्षिणीकृत्य तुलामित्यभिमन्त्रयेत् ॥ १९८.९८ ॥
शुचिरक्ताम्बरो वा स्याद्गृहीत्वा कुसुमाञ्जलिम् ।
नमस्ते सर्वदेवानां शक्तिस्त्वं परमा स्थिता ॥ १९८.९९ ॥
साक्षिभूता जगद्धात्री निर्मिता विश्वयोनिना ।
त्वं तुले सर्वभूतानां प्रमाणमिह कीर्तिता ॥ १९८.१०० ॥
कराभ्यां बद्धमुष्टिभ्यामास्ते पश्यन्नुमामुखम् ।
ततोऽपरे तुलाभागेन्यसेयुर्द्विजपुंगवाः ॥ १९८.१०१ ॥
द्रव्यमष्टविधं तत्र ह्यात्मवित्तानुसारतः ।
मन्दशभूते विप्रेन्द्र पृथिव्यां यदधिष्ठितम् ॥ १९८.१०२ ॥
सुवर्णं चैव निष्पावांस्तथा राजिकुसुम्भकम् ।
तृणराजेन्दुलवणं कुङ्कुमं तु तथाष्टमम् ॥ १९८.१०३ ॥
एषामेकतमं कुर्याद्यथा वित्तानुसारतः ।
साम्यादभ्यधिकं यावत्काञ्चनादि भवेद्द्विज ॥ १९८.१०४ ॥
तावत्तिष्ठेन्नरो नारी पश्चादिदमुदीरयेत् ।
नमो नमस्ते ललिते तुलापुरुषसंज्ञिते ॥ १९८.१०५ ॥
त्वमुमे तारयस्वास्मानस्मात्संसारकर्दमात् ।
ततोऽवतीर्य मुरवे पूर्वमर्द्धं निवेदयेत् ॥ १९८.१०६ ॥
ऋत्विग्भ्योऽपरमर्द्धं च दद्यादुदकपूर्वकम् ।
तेभ्यो लब्धा ततोऽनुज्ञां दद्यादन्येषु चार्थिषु ॥ १९८.१०७ ॥
सपत्नीकं गुरुं रक्तवाससी परिधापयेत् ।
अन्यांश्च ऋत्विजः शक्त्या गुरुं केयूरकङ्कणैः ॥ १९८.१०८ ॥
शुक्लां गां क्षीरिणीं दद्याल्ललिता प्रीयतामिति ।
अनेन विधिना या तु कुर्यान्नारी ममालये ॥ १९८.१०९ ॥
मत्तुल्या सा भवेद्राज्ञां तेजसा श्रीरिवामला ।
सावित्रीव च सौन्दर्ये जन्मानि दश पञ्च च ॥ १९८.११० ॥
याप्रमाणे श्‍लोक दिलेले आहेत.
(1) विशालाक्षी - वाराणसी, (2) लिंगधारिणी - नैमिषारण्य, (3) ललिता - प्रयाग, (4) कामाक्षी - गंधमादन पर्वत, (5) कुमुदा - मानस सरोवरस, (6) विश्‍वकामा - दक्षिणेत आणि उत्तरेस भगवती, (6) गोमती - गोमंत पर्वत, (7) कामचारिणी - मंदार पर्वत, (8) मदोत्कटा - चैत्ररथबन, (9) जयंती - हस्तिनापूर,
(10) गौरी - कान्यकुब्ज, (11) रंभा - मलय पर्वत, (12) कार्तिमती - एकाम्रक पर्वत, (13) विश्‍वेश्‍वरी - विश्‍वेश्‍वर क्षेत्र, (14) पुरुहुता - पुष्कर, (15) सन्मार्ग दायिनी - केदार, (16) नंदा - हिमालय, (17) भद्रकर्णिका - गोकर्ण, (18) भवानी - ठाणेश्‍वर, (19) बिल्वपत्रिका - बिल्वकपीठ, (20) माधवी - श्रीशैव, (21) भद्रा - भद्रेश्‍वर, (22) जया - वराह पर्वत, (23) कमला - कमलालय, (24) रुद्राणी - रुद्रकोटितीर्थ, (25) काली - कलंजर पर्वत, (26) कपिला - महालिंग क्षेत्र, (27) महादेवी - शाळिग्राम क्षेत्र, (28) जळप्रिया - शिवलिंग क्षेत्र, (29) मुकुटेश्‍वरी - मोकाट क्षेत्र, (30) कुमारी - मायापुरी, (31) ललिताम्बिका - संतान क्षेत्र, (32) मंगला – गया (33) उत्पलाक्षी - सहस्राक्ष क्षेत्र, (34) महोत्पला - हिरणाक्ष क्षेत्र, (35) अमोद्याक्षी - विवाशा नदीवर विशाखा क्षेत्र, (36) पाडळा - पुंड्रवर्धन क्षेत्र, (37) नारायणी - सुपार्श्‍व, (38) रुद्रसुंदरी - चित्रकूट पर्वत, (39) विपुला - विपुल क्षेत्र, (40) कल्याणी - मलयाचल पर्वत, (41) एकवीरा - सह्याद्री पर्वत, (42) चंद्रिका - हरिश्‍चंद्रपीठ, (43) रमणा - रामतीर्थ, (44) मृगावती - यमुनापीठ, (45) कोटवी- कोटितीर्थ, (46) सुगंधा – मधुवन, (47) त्रिसंध्या - गोदावरी तीर, (48) रतिप्रिया - गंगाद्वार, (49) शुभानन्दा - शिवकुंड, (50) नंदिनी - देविका नदीतटी, (51) रुक्‍मिणी - द्वारका, (52) राधा - वृंदावन, (53) देवकी - मथुरा, (54) परमेश्‍वरी - पाताळ, (55) सीता - चित्रकूट, (56) विंध्यवासिनी - विंध्याचल, (57) महालक्ष्मी - करवीर क्षेत्र, (58) उमा - विनायक क्षेत्र, (59) आरोग्या - वैद्यनाथ, (60) माहेश्‍वरी - महाकालपीठ, (61) अभया - उष्णतीर्थ, (62) नितंबा - विंध्य पर्वतावर, (63) मांडवी - मांडव्य पीठ, (64) स्वाहा - माहेश्‍वरीपूर, (65) प्रचंडा - छगलंड क्षेत्र, (66) चंडिका - अमरकंटक, (67) वरारोहा - सोमेश्‍वर, (68) पुष्करावती - प्रभास क्षेत्र, (69) देवमाता - सरस्वती तीर्थ, (70) पारावारा - पारा नदीतटी, (71) महाभागा - महालय क्षेत्र, (72) पिंगळेश्‍वरी - पयोष्णी, (73) सिंहिका - कृतशौचतीर्थ, (74) अतिशांकरी - कार्तिकस्वामी तीर्थ, (75) उत्पला - वर्तक तीर्थ, (76) लोला - शोण नदीसंगम, (77) लक्ष्मी - सिद्धवन, 78) अनंगा - भारताश्रम तीर्थ, 79) विश्‍वमुखी - जालंधर पर्वत, 80) तारा - किष्किन्धा पर्वत, (81) पुष्टि - देवदारुवन, (82) मेधा - काश्‍मीर प्रदेश, (83) भीमा - हिमालय पर्वत, (84) तुष्टि - विश्‍वेश्‍वर क्षेत्र, (85) शुद्धिकाया - कपाळमोचन तीर्थ, (86) माता - कायावरोह तीर्थ, (87) धरा - शंखोधर तीर्थ, (88) धृति - पिंडारक तीर्थ, (89) कळा - चंद्रभागा नदीतटी, (90) शिवधारिणी - अच्छोद क्षेत्र, (91) अमृता - वेणा नदीतटी, (92) उर्वशी - बदरी वन, (93) ओषधि - उत्तरकुरू प्रदेश, (94) कुशोदका - कुशद्वीप, (95) मन्मथा - हेमकूट पर्वत, (96) सत्यवादिनी - कुमुद वन, (97) वंदनीया - अश्‍वत्थ तीर्थ, (98) निधी - वैश्रवणालय क्षेत्र (कुबेरगृह), (99) गायत्री - वेदवदन तीर्थ, (100) पार्वती - भगवान शंकराच्या सान्निध्यात (101) इंद्राणी -देवलोकात, (102) सरस्वती - ब्रह्मलोकात, (103) प्रभा - सूर्यबिंबाच्या ठिकाणी, (104) वैष्णवी - मातृकामध्ये, (105) अरुंधती - पतिव्रता स्त्रीवर्गामध्ये, (106) तिलोत्तमा - अप्सरांमध्ये, (107) विमला - पुरुषोत्तम पीठ, (108) ब्रह्मकला - प्राणिमात्रांच्या चित्तामध्ये वास करीत असते.
हे एकशे आठ पीठांचे देवीस्तोत्र जो रोज पठण करील अगर सर्व पीठ-देवतांचे दर्शन घेईल, त्यावर देवीची कृपा सदैव राहील, असे फळ सांगितले आहे.
ही माहिती माहीतीच्या महाजालामधुन घेतली आहे.

मंगळवार, १० सप्टेंबर, २०१९

विश्वनाथ विष्णू तथा राजाभाऊ मेहेंदळे.


।।श्रीराम।।
मला भावलेले व्यक्तिमत्व:
विश्वनाथ विष्णू तथा राजाभाऊ मेहेंदळे.
लेखक- अनिल अनंत वाकणकर,
श्रीमंत पेशवे मार्ग,
श्रीवर्धन, जिल्हा- रायगड


            माझ्या आयुष्यात अनेक व्यक्ती आल्या आणि गेल्या. काही लक्षांत राहिल्या काही विस्मरणांत गेल्या. परंतु फारच थोड्या व्यक्ती अशा आहेत ज्यांनी मनांत कायमचे घर करुन ठेवले आहे. त्यातिलच एक व्यक्ती म्हणजे मेहेंदळे रावसाहेब. त्यांचे पूर्ण नांव आहे, विश्वनाथ विष्णू मेहेंदळे त्यांच्या परिचयाचे लोक त्यांना राजाभाऊ म्हणून ओळखत असत.
     त्याचे मूळगांव गणपतीपुळ्याजवळचे मालगुंड. हे गांव केशवसुतांचे गांव म्हणून प्रसिध्द आहे. सुरवातिला त्यांनी मालगुंड नजिक असणाऱ्या नांदिवडे येथे प्राथमिक शिक्षक किंवा त्याकाळातले शाळामास्तर म्हणून काम केले. त्यांनी त्याकाळात शिकवलेल्या त्यांच्या एका विद्यार्थ्याचीही माझी भेट झाली होती. त्यानंतर त्यांची पोस्टखात्यात निवड झाली. त्याकाळात पोस्ट ऑफिसमध्ये सर्वात जास्त पगार मिळत असे. असे म्हणतात त्याकाळी लोकांनी रिझर्व बँकेतली नोकरी सोडून पोस्टात नोकरी स्विकारली होती. पोस्ट ऑफिसमध्ये निवड झाल्यानंतर त्याचे ट्रेनिंग आणि सुरवातिचे पोस्टींग देखिल गुजराथमध्ये झाले होते.
     माझी त्यांची पहिली भेट झाली गोरेगांवच्या पोस्टांत. मी नुकताच श्रीवर्धनहून माणगांव येथे लिव्ह रिझर्व पोस्टमन म्हणून रुजु झालो होतो. मला पहिलेच डेप्युटेशन गोरेगांवचे आले होते. त्यावेळी गोरेगांव येथे मेहेंदळे रावसाहेब पोस्टमास्तर म्हणून काम पहात होते. डेप्यूटेशनवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला तेव्हा दैनंदिन भत्ता मिळत असे. मी तेव्हा माणगांव येथे नुकतीच खोली भाड्याने घेतली होती. त्यामुळे मी माणगांव गोरेगांव जाऊन येऊन करण्याचा विचार केला होता.
     मी गोरेगांव येथे हजर झाल्यावर त्याच दिवशी त्यांनी मला खडसावले होते. तुम्ही माणगांवला राहून गोरेगावचयेथे काम करणार आहात आणि भत्ताही घेणार आहात! तेव्हा मी कोणतेही सर्टिफिकेट देणार नाही. इथे रहायचे असेल तर त्याची सोय मी करु शकतो. पहिल्याच भेटीत त्यांनी दिलेला दम ऐकून मी खूपच घाबरलो होतो. कारण तेव्हा मला नोकरी लागुन जेमतेम सहा महिने झाले होते. परंतु नंतर त्यांचा परिचय झाला आणि त्यांचा सडेतोड स्वभाव हा  त्यांचा मुखवटा आहे हे लक्षांत आले. मेहेंदळे रावसाहेब कोणालाही कधीही मदतीला तत्पर असायचे. अनेकांचे आयुष्य त्यांनी मार्गी लावले आहे.

     त्यांचा माझा परिचय वाढला तो ते श्रीवर्धन पोस्टांत सब पोस्टमास्तर म्हणून हजर झाल्यानंतर. त्यावेळी माझीही बदली परत श्रीवर्धनला झाली होती. तेव्हा माझी सर्व्हीस तिन वर्षे पूर्ण झाली होती. पोस्टाच्या नियमाप्रमाणे तिन वर्षे पूर्ण झाल्यावर प्रमोशन परिक्षा देता येत असे. मात्र त्या कर्मचाऱ्याला परमानंट अथवा क्वाझी परमानंट केलेले असणे गरजेचे होते. मेहेंदळे रावसाहेब हजर झाल्यावर त्यांनी माझी क्वाझी परमानंट केल्याची ऑर्डर काढली. त्यानंतर लगेचच दोन वर्षांनी परमानंटची ऑर्डर देखिल त्यांनीच काढली होती. जेव्हा प्रमोशन परिक्षा जाहिर झाली तेव्हा त्यांनी मला अभ्यास करण्याकरीता कामाच्या वेळेत सवलत तर दिलीच, त्याशिवाय त्यांनी मला असे सांगितले की,  त्याचे जिवश्च कंठश्च असणारे पेंडसे मास्तर महाड येथे प्रमोशन परिक्षेकरीता क्लास घेत आहेत तिकडे जा.
     त्या क्लासला जायचे म्हणजे महाड येथे रहाण्याची, जेवणाखाणाची सोय बघायला पाहिजे होती. याशिवाय जवळपास महिनाभर तेथे रहाण्याकरीता दामाजीपंतांची देखिल जरुरी होती. माझ्या या सगळ्या सबबी ऐकल्यावर त्यांनी माझी रहाण्याची, जेवणाची आणि पैशाची देखिल सोय केली. दुर्दैवाने मी त्यावेळी ती परिक्षा पास होऊ शकलो नाही. किंबहूना ते श्रीवर्धनला असे पर्यंत मी क्लार्क झालो नाही. परंतु या सर्व प्रसंगातुन त्यांच्यातील माणूसकीचे दर्शन झाले. एखाद्याचे आयुष्य बनावे याकरीता त्यांच्या ठाई असणारी तळमळ दिसुन येत होती.
     ते सेवानिवृत्त झाले तेव्हा ते पेण येथे कार्यरत होते. त्यामुळे त्यांचा निरोप समारंभ आम्हाला करता आला नव्हता. ती इच्छा पूर्ण करण्याकरीता आम्ही जेव्हा दिवेआगर येथे श्री केमनाईक साहेबांचा निरोप समारंभ आयोजित केला होता. त्यावेळी त्यांचाही सत्कार समारंभ करायचे ठरवले होते. हा समारंभ दिवेआगर येथे यज्ञेश्वर उर्फ भाऊ करमरकर यांचे मांडवात आयोजित केला होता. त्यावेळी श्रीवर्धन तालुक्यातिल त्यांच्या परिचयाचे अनेकजण हजर होते.


     ते सेवानिवृत्त झाल्यानंतर बरेच वर्ष श्रीवर्धन येथेच रहात होते त्यामुळे त्यांच्याशी सतत संपर्क होता. ते नारायण पाखाडीत दादा टेमकर यांच्या घरात रहात होते. त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर श्रीवर्धन येथे हळबे रावसाहेब पोस्टमास्तर म्हणून आले होते. त्यांना श्री शिवमहिम्न शिकायचे होते, माझेही अर्धे झालेले होते. तेव्हा आम्ही दोघे आणि आमच्या जोडीला मेहेंदळे साहेब देखिल मोरुतात्या उपाध्ये यांच्यकडे महिम्न शिकायला जायचो. तेव्हा दररोज संध्याकाळी आधी मेहेंदळे साहेबांकडे बैठक असायची त्यानंतर महिम्न. ते टेमकरांच्या घरांत रहात असताना अधिक महिना आला होतो. तेव्हा आम्ही (म्हणजे मी, माझी सौ., मेहेंदळे साहेब, मेहेंदळे बाई आणि सौ. गंद्रे) त्यांच्या घरी दासबोधाचे पारायण केले होते.
     कालांतराने मेहेंदळे बाई देखिल सेवानिवृत्त झाल्या आणि त्यांनी आपला मुक्काम लोणेऱ्याला स्वत:च्या घरात हलवला. मी देखिल प्रमोशन होऊन दिवेआगर, वाळवटी आणि श्रीवर्धन येथे क्लार्क अथवा सबपोस्टमास्तर म्हणून काम केले होते. त्यानंतर मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने मी माझी बदली गोरेगांव येथे करुन घेतली. तेव्हा परत आमचा मेहेंदळे साहेबांशी संपर्क झाला. त्यावेळी आम्ही मॉर्निंग वॉकला लोणेऱ्या पर्यंत जात असू. तेव्हा जाता येता कधीतरी त्यांची गाठ पडत असे. विशेष म्हणजे गोरेगांव येथे आम्ही आमचे बिऱ्हाड मेहेंदळे साहेब पूर्वी जेथे रहात असत त्या बबन मोने यांच्या घरांतच केले होते. मेहेंदळे साहेब जवळपास दररोजच गोरेगांव येथे येत असत त्यामुळे त्यांची रोजच भेट होत असे.
     केदारला लोणेरे येथिल बाटु मध्ये डिप्लोमा करीता प्रवेश घेतला होता. त्याचा डिप्लोमा पुरा झाल्यावर त्याचे कँपस इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्शन झाले होते. ही गोष्ट मेहेंदळे साहेबांना समजली तेव्हा ते ताबडतोब माझ्या घरी आले आणि केदारला नोकरी न करता डिग्री पूर्ण कर असे निक्षुन सांगितले. त्यावर आम्ही गोलमाल बोलल्यावर, त्यांनी पैशाची अडचण आहे कां असे स्पष्ट विचारले. तेव्हा पैशाचा प्रश्न नाही आणि जरुर वाटली तर बँकेतुन लोन घेता येईल असे म्हटले. त्यानंतर त्यांनी त्यांचा मुलगा विनय याच्याशी बातचित करुन एक प्रस्ताव माझे समोर ठेवला होता. त्यांनी मला केदारच्या डिग्री करीता लागणारे पैसे बँकेतुन न घेता ते देणार आहेत असे बजावले. त्यांनी विनयला असेही सांगितले होते की, मी जरी नसलो तरी केदारचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत लागणारी रक्कम तो देईल. सुदैवाने मला त्यांच्याकडून पैसे घेण्याची वेळ आली नाही. परंतु त्यांनी ते असोत अथवा नसोत केदारच्या शिक्षणाकरीता लागणाऱ्या पैशाची तरतूद केली होती. ही गोष्ट त्यांचा मनाचा मोठेपणा आणि परोपकारी वृत्ती दाखवत होती.  अशाच प्रकारे त्यांनी अनेकांना मदत केली होती.
     पुढे त्यांची पंचाहत्तरी गोरेगांव येथे आयोजित केली होती. त्या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो. त्यावेळी त्यांनी त्यांना अती प्रिय असणारा तंबाखु सोडला होता. त्याचप्रमाणे यापुढे अंगाला सोने लावणार नाही हा देखिल निर्धार त्यांनी केला होता. लोणेऱ्याला असताना मी अनेकदा पोस्टाच्या कामासंदर्भात त्यांचा सल्ला घ्यायला जात असे. गोरेगांवहून नंतर माझी बदली दासगांव येथे पोस्टमास्तर म्हणून झाली. ती बदली मी केवळ गोरेगांव येथुन जाऊन येउन करता येईल म्हणून मी स्विकारली होती. मला साहेब तिथे जाण्यापेक्षा दुसरे सेफ ऑफिस देतो म्हणून सांगत होते. त्याला कारण असे होते, दासगांवला पैशांची अफरातफर झालेली होती. त्यामुळे तेथे अगदी डोळ्यांत तेल घालुन काम करणे आवश्यक होते.  त्यावेळी मला मेहेंदळे साहेबांची खूपच मदत झाली. त्यावेळी मी दररोज लोणेरे येथे त्यांच्याकडे थांबुन दासगांव येथे दिवसभरांत झालेल्या सर्व घटनांबाबत मी त्यांच्याशी चर्चा करुन त्याचा सल्ला घेऊन काम करीत असे. त्यांच्या बहुमोल सल्ल्यामुळे मी दासगांवचे शिवधनुष्य पेलू शकलो.
     या ठिकाणी त्यांची एक आठवण आवर्जुन सांगाविशी वाटते. ते नियम आणि व्यवहार यांची सांगड घालुन काम करीत असत. ते श्रीवर्धन येथे कार्यरत असताना एका गावांत जवळपास साठ सत्तर आर्.डी. खात्यांची मुदत संपल्याने त्या लोकांना एका दिवशी रक्कम अदा करायची होती. त्या सर्व खातेदारांनी श्रीवर्धन येथे येण्याकरीताचा वेळ आणि पैसे खर्च करुन येण्याऐवजी त्यांना त्यांच्या गावात जाऊन रक्कम वाटप करण्याची योजना श्री मेहेंदळे साहेब यांनी केली होती. त्याकरीता आवश्यक असणाऱ्या तरतुदी त्यांनी केल्या आणि त्या खातेदारांना सर्व रक्कम त्यांच्या गावांत जाऊन अदा केली होती. या मध्ये कोणाचेही नुकसान नव्हते की फायदा. परंतु ही गोष्ट नियमाविरुध्द होती. या गोष्टीचा लेखी रिपोर्ट आमच्याचपैकी एकाने साहेबांना केला होता. या व्यवहारांत खातेदारांची सोय झाली परंतु मधल्या मधे मेहेंदळे साहेबांना खात्यामार्फत चौकशीला सामोरे जावे लागले त्यातुन त्यांना किरकोळ शिक्षा देखिल झाली होती.
     श्रीवर्धन पोस्टांत सन १९८० पासुन सत्यनारायणाची पूजा आयोजित केली जाते. हा कार्यक्रम ऑफिस स्टाफ आणि त्यांचे कुटूंबीय मिळून साजरा करतात. मेहेंदळे साहेब श्रीवर्धनला येण्यापूर्वी हा कार्यक्रम अगदी साध्या स्वरुपात साजरा केला जात असे. मेहेंदळे साहेब पोस्टमास्तर म्हणून हजर झाल्यावर पहिल्याच वर्षी सत्यनारायणाची पूजा साजरी करण्याचा विषय आला होता. त्यावेळी त्यांनी त्यांच्या स्वभावाप्रमाणे सर्वांना सांगितले, हा कार्यक्रम जर बंद करायचा असेल तर तुम्ही तसे करु शकता त्याकरीता मी परवानगी देत नाही असे जाहिर केले तरी चालेल. परंतु जर चालू ठेवायची असेल तर ती परत बंद करुन चालणार नाही. परंतु सर्वांनी ही परंपरा चालू ठेवायचीच असे सांगितले. त्यानंतर मात्र हा पूजेचा कार्यक्रम हा एक सोहळाच व्हायला लागला. परंपरेप्रमाणे आदल्या रात्री सर्व ऑफिस धुण्यापासुन पूजेच्या दिवशी रात्री भजनाची बारी होई पर्यंत सर्व स्टाफ मनापासुन भाग घेत असे. अशाप्रकारचे कार्यक्रम साजरा करण्याकरीता मॉनेटरची भूमिका महत्वाची असते. ती भूमिका मेहेंदळे साहेब तन, मन, धन खर्च करुन निभावायचे. त्यावेळी त्यांचा उत्साह एवढा असायचा की, जेवण तयार करण्याकरीता इंधन जमा करण्यापासुन ते भाजी, आमटी फोडणीला टाकेपर्यंत त्यांचा सहभाग असे. त्यांचा तो उत्साह पाहून सर्वांचाच उत्साह वाढत असे.
     अशा या जगमित्र असणाऱ्या मेहेंदळे साहेबांचे निधन झाल्याचा फोन त्यांची मुलगी वीणा हीने केला होता. त्यानंतर त्यांच्या आठवणींना उजाळा देऊन त्यांना श्रध्दांजली वहावी असे ठरवले होते. हे लेखन ही त्यांना वाहिलेली माझी श्रध्दांजलीच आहे. ते माणूस म्हणून किती मोठे होते याचा अनुभव त्यांचा सहवास लाभलेलेच जाणतात. मालगुंड येथिल नारळाप्रमाणेच ते वरुन कठोर आणि अंतर्यामी मधाळ, स्निग्ध असे होते. त्यांना माझी ही आदरांजली!

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

जयंत जयराम उर्फ बंधू केमनाईक



मला भावलेल्या व्यक्ती
जयंत जयराम उर्फ बंधू केमनाईक



     मला भेटलेल्या आणि भावलेल्या व्यक्तीमत्वांचे चित्रण करायचा मी प्रयत्न करीत आहे. आज मी अशा एका व्यक्तीची माहिती सांगणार आहे, जिने आयुष्यभर कष्टच केले आणि जबाबदाऱ्यांचे ओझे वागविले. ते आहेत माझे क्लार्कच्या नोकरीतले पहिले गुरु. त्याचे नांव आहे, जयंत जयराम केमनाईक. त्यांना संबोधन मात्र बंधू असे आहे. बंधू म्हणजे अर्थातच मोठा भाऊ. मोठ्याभावाला नेहमी कर्तव्यच करायचे असते. आपल्या लहान भावंडांची काळजी घेणे त्यांच्या अडीनडीला धाऊन जाणे हिच भूमिका त्यांनी कायम निभावली. त्याकरीता ती भावंडे रक्ताचीच असायची जरुरी नाही. त्यांना बंधू म्हणून मानणारी सर्वच त्यांची भावंडे होती.
     त्यांचे आतापर्यंतचे सर्व आयुष्य जबाबदाऱ्या सांभाळण्यातच गेले. आता कोठे चार सुखाचे समाधानाचे दिवस आले तेव्हा त्यांच्या प्रकृतीने दगा दिला आहे. त्यांनी आपले तन आणि मन पोस्टाच्या सेवेला वाहिलेले होते. त्यांच्या नोकरीची सुरवात बॉय मेसेंजर या पदाने झाली. त्याकाळात आलेल्या तारा(Telegrams) वाटपा करीता १६ वर्षे पूर्ण झालेल्या मुलांची नेमणूक करीत असत. वयाची अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर ते रेग्युलर पोस्टमन म्हणून काम करु लागले. त्याकाळात पोस्टात कामावर जाण्याकरीता परिक्षा वगैरे द्याव्या लागत नसत. कारण तेव्हा पोस्टात कामाला माणसेच मिळत नसत. आपल्या ओळखितील लोकांना पोस्टात चिकटवत असत.
     त्या काळांत पोस्टामध्ये व्हीलेज पोस्टमन म्हणून काही जागा असत. त्यांना आठवड्याची बीट असे. श्रीवर्धन येथे देखिल तेव्हा व्हीलेज पोस्टमनची पोस्ट होती. त्याची कामगीरी सोमवारी सुरु होत असे. सोमवारी मुख्यालयातुन आपली सर्व कामगिरी म्हणजेच पत्रे, मनीऑर्डर, रजी पत्रे इ. ताब्यात घेऊन त्याचप्रमाणे मनी ऑर्डर पेमेंट करीता लागणारी कॅश घेऊन व्हीलेज पोस्टमन निघत असे. पहिल्या दिवशी चालत चालत श्रीवर्धन दांडे येथिल तरीने कुरवडे, काळींजे, सायगाव पर्यंत पत्रे वगैर वाटत, पेमेंट करत, त्या त्या गावांमधिल पाठवायची पत्रे गोळा करत तो सायगांव येथे वस्ती करत असे. दुसऱ्या दिवशी मंगळवारी निगडी, निवळा, गालसुर, बापवन, रानवली या गावांचे टपाल वाटुन व जमा करुन रानवली येथे वस्ती करीत असे. तिसऱ्या दिवशी  बुधवारी जसवली, भट्टीचा माळ येथिल टपाल वाटून व गोळा करुन तिन दिवसात केलेल्या कामगिरीचा हिशेब द्यायला श्रीवर्धन येथे येत असे. त्यानंतर गुरुवारी परत सोमवार प्रमाणेच सर्व कामगिरी ताब्यात घेऊन वाळवटी, आरावी, कोंडवीली, शेखाडी, चिखलप, शिरवणे, मामवली, गुळधे, या विभागातिल टपाल वितरण आणि जमा करणे ही कामगीरी शनिवार पर्यंत करुन हिशेब द्यायला शनिवारी श्रीवर्धनच्या पोस्टांत हजर होत असे. अशी ही सात दिवसांची व्हीलेज बीट देखिल बंधूनी बदली कामगार म्हणून केली होती.  पोस्टमनच्या नोकरी पुरेशी झाल्यावर त्यांनी मेल ओव्हरसिअरचे काम स्विकारले. हे काम म्हणजे मोठ्या जबाबदारीचे काम होते. शाखा डाकघरांची नियमित तपासणी करणे ही मुख्य जबाबदारी मेल ओव्हरसिअरची असायची. जर एखाद्या शाखा डाकपालाने काही गफला केला तर त्याची पहिली जबाबदारी मेल ओव्हरसिअरवर थोपवली जायची.
     त्याकाळात सर्व पत्रव्यवहार पोस्टानेच होई. कोणी जन्माला आले किंवा कोणी मरण पावले तर ती बातमी पत्रानेच समजायची. त्यामुळे पत्रांच्या वितरणावर पोस्ट खात्याची बारीक नजर असायची. एक आण्याला मिळणारे पोस्टकार्ड जर नियत काळापेक्षा उशिरा वितरीत झाल्याचे सिध्द झाले तर त्याला जबाबदार असणाऱ्या कर्मचाऱ्याला तात्काळ कामावरुन निलंबित करण्यात येत असे. अशा प्रकारची कार्यवाही करण्याचे अधिकार तेव्हा ओव्हरसिअरला देखिल असत.
     शाखा डाकपालांचे दैनंदिन हिशेब तपासणे, पोस्टाच्या बचत खात्यांच्या खातेदारांना त्यांच्या घरी जाऊन भेटून त्यांच्या पासबुकांची तपासणी करणे आणि त्यात काही गफलत असेल तर तसा रिपोर्ट करुन योग्य ती कार्यवाही करणे, खेडोपाडी जाऊन तेथिल लेटर बॉक्स वेळेवर उघडले जातात का नाही ते तपासणे, शाखा डाकघरांतुन वितरणाला जाणाऱा कर्मचारी नियमितपणे खेडेगावांना भेट देतो की नाही हे तपासणे अशी अनेक जबाबदारीची कामे ओव्हरसिअरला करावी लागत असत. त्याच्या पोस्टचे नांव ओव्हरसिअर असले तरी तो वठवित असलेली भूमिका इन्स्पेक्टरचीच असायची. फार तर सब इन्स्पेक्टर म्हणूया. हे जबाबदारीचे काम बंधूंनी समर्थपणाने पेलले. या कामामध्ये रोजचा प्रवास, रोज नवे नांव, रोज वेगळे पाणी, वेगळे जेवण यामुळे प्रकृतीला हे त्रासदायक असायचे. याशिवाय दररोजचे टेन्शन एखादा गफला झाला आणि तो नजरेआड झाला तर पहिली कारवाई ओव्हरसिअरवर व्हायची.   
     मेल ओव्हरसिरची नोकरी बरेच दिवस केल्यावर त्यांनी क्लार्कची परिक्षा देण्याच्या दृष्टीने तयारी सुरु केली. परंतु घोडे इंग्रजीशी अडू लागले कारण त्यांचे शिक्षण कौटुंबीक परिस्थिती मुळे कमी झाले होते. त्यामुळे त्यांना इंग्रजीचा  बाऊ वाटत असे. पोस्टाच्या नियमाची सर्व पुस्तके त्या काळांत इंग्रजीतच असत. तेव्हा त्यांनी श्रीवर्धनचे चितळे मास्तर व्ही. सी. जोशी सरांकडे इंग्रजी शिकणे सुरु केले. त्यांना या कामात माझ्या माहितीप्रमाणे त्यावेळी श्रीवर्धन येथे असणारे पोस्टमास्तर वैद्य आणि कोल्हटकर यांनी मदत केली. आणि त्यांना क्लार्कची परिक्षा देण्यास मनाने आणि अभ्यासाने तयार केले. यामधिल वैद्यमास्तर हे श्रीवर्धन येथील पेशवे आळीतिलच होते. बंधू सांगायचे त्याप्रमाणे एखाद्या वकिलाला जसे सर्व कायदे मुखोद्गत असावेत तसे वैद्य मास्तरांचे पोस्टाचे नियम कोणत्या पुस्तकांत कोणत्या पानावर आहेत हे तोंड पाठ होते. अशा माणसाचे बंधूंना पाठबळ होते म्हटल्यावर बंधू क्लार्कच्या परिक्षेचे शिवधनुष्य पेलणार नाहीत असे होणारच नाही. अर्थातच बंधू पोस्टल क्लार्क झाले.
     काही वर्षे क्लार्कचे काम केल्यानंतर त्यांची बदली बोर्लीपंचतन येथे झाली. तेथे त्यांना भिसे साहेब पोस्टमास्तर होते. भिसेमास्तर शिस्तप्रिय आणि सर्व नियमांची जाण असणारे होते. बंधूदेखिल त्याच प्रवृत्तीचे होते त्यामुळे त्यांचे तेथे छान मेतकूट जुळले. नियमांच्या बारकाव्या वरुन त्यांचे आणि भिसे साहेबांचे कधी वाद होत असत. परंतु त्यातुन त्या नियमांचे नव्याने ज्ञान होत असे. तेथे अनेकवेळा सिंगल हँडेड पोस्टमास्तर म्हणून स्वतंत्रपणाने काम करण्याचा अनुभव बंधूंना मिळाला, अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या.
     त्यानंतर त्यांनी अनेक वर्षे सिंगल हँडेड पोस्टमास्तर म्हणून काम केले. त्यात बागमांडला हे त्यांचे अशाप्रकारचे पहिले ऑफिस. येथे त्यांचा स्वतंत्र संसार सुरु झाला. सुरवातिला गाडग्या मडक्यांच्या सहाय्याने सुरु केलेला संसार पुढे भरभराटीला आला. तिथपर्यंत माझा आणि त्यांचा परिचय नव्हता. मी पोस्टांत नोकरीला लागेपर्यंत पोस्टाशी देखिल संबध नव्हता. मी जेव्हा पोस्टमन म्हणून श्रीवर्धन येथे हजर झालो तेव्हा बंधूंचा मला अभिनंदनाचा फोन आला होता. ही त्यांची आणि माझी पहिली अप्रत्यक्ष भेट. त्यानंतर त्यांची बदली श्रीवर्धन येथे झाली तेव्हा त्यांची प्रत्यक्ष भेट झाली. त्यानंतर परिचय वाढत गेला. दरम्यान त्यांची दिवेआगर, म्हसळा येथे बदली झालेली होती. त्यानंतर मी जेव्हा क्लार्कची परिक्षा पास झालो तेव्हा माझे पहिले पोस्टींग दिवेआगर येथे झाले होते. त्यावेळी बंधू तिथे पोस्टमास्तर म्हणून काम पहात होते.
     दिवेआगरयेथे माझी प्रमोशनवर बदली झाली परंतु आर्थिक परिस्थिती खालावली कारण श्रीवर्धन येथे स्वत:च्या घरात रहात होतो. पोस्टमन म्हणून कपडे, जोडे, छत्री सर्व सरकारी मिळत असे. येथे त्याच्या उलट होते. पगार वाढला पस्तिस रुपये आणि खर्च वाढला दोनशे रुपये. कारण घरभाडे आणि इतर खर्च वाढला होता. तेव्हा मला बंधूनी खूप धीर दिला कारण तेही या परिस्थितीतुन गेले होते. त्यांनी दिवेआगर मध्ये अनेक माणसे जोडली होती, लोकाचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास होता. बंधूंनी त्यांच्या परिचयाचे आणि अगदी कुटूंबातिल एकच असल्यासारखे असणारे बाळ करमरकर उर्फ भाऊ यांच्याकडे मला रहायला जागा मिळवुन दिली. ते घर पोस्टाच्या अगदी जवळ होते. त्यानंतर करमरकर कुटूंबाचा परिचय खूप वाढला आणि आम्ही त्यांच्या कुटूंबातलेच एक झालो.
     केमनाईक, वाकणकर आणि करमरकर यांचे जणू एक कुटूंबच तेथे स्थापित झाले होते. तेथे आम्ही प्रथम जिलेबी तयार करायचा प्रयत्न केला होता. त्यानंतर अनेक वेळा आम्ही हा प्रयोग केला होता. इतके की, तेथिल दुकानदार प्रकाश दातार त्यांच्या दुकानात गेल्यावर  आम्हाला बरेच दिवसात जिलेबी झाली नाही कां? असे विचारायला लागले होते. आमच्या तिन कुटूंबाचा अनेकवेळी एकत्र जेवणाचा कार्यक्रम होई. त्याला कोणतेच कारण लागत नसे. आले मनांत की लगेचच अमलात आणले जाई.
     बंधूच्याकडे मी पोस्टाच्या कामा संदर्भात अनेक गोष्टी शिकलो. पोस्टाचे अहर्निशं सेवा महे हे ब्रीदवाक्य ते अक्षरश: जगत होते. वास्तविक दिवेआगर पोस्टाची वेळ सात वाजता सुरु होई, परंतु ते सकाळी साडेसहालाच तयार होऊन कामावर हजर झालेले असत. त्याला कारण होते तेथिल शाखा डाकघरांचे टपाल घेऊन जाणारी गाडी सकाळी साडे सहाला दिवेआगर गावात जायची आणि सात वाजता परत फिरुन  घेऊन जायची. या दिवेआगर गावात जाऊन परत येण्याच्या काळात बंधू शाखा डाकघराकडून आलेला हिशेब तपासुन त्यात काही गफलत असेल तर परत जाणाऱ्या टपालाबरोबर तसा निरोप द्यायचे.
            सध्या स्वच्छ भारत या योजनेला खूप प्रसिध्दी देण्यांत येत आहे. परंतु बंधू आपल्या कार्यालयात आणि त्याच्या परिसरात स्वच्छते बाबत खूप दक्ष असत. कागदाचा अगदी छोटासा कपटा जरी पडलेला त्यांना दिसला तरी ते तो स्वत: उचलुन डस्टबीनमध्ये टाकीत असत. त्यामुळे व्हायचे काय की, दुसरा कोणी ऑफिसमध्ये कचरा करताना कचरायचा. स्वत: साहेब कचरा उचलतायत हे बघितल्यावर सर्व स्टाफवर त्याचा परिणाम व्हायचा. त्यामुळे बंधू असलेल्या ऑफिसमध्ये सर्व चकाचक असायचे. याची दखल प्रशासकिय अधिकाऱ्यांनी देखिल घेतली होती. त्यांना दोनवेळा स्वच्छ कार्यालचाचा खास पुरस्कार मिळाला होता.
     कोणत्याही कार्यालयामध्ये जशी स्वच्छता, उत्तम प्रशासन आवश्यक असते त्याचप्रमाणे दररोज निर्माण होणारे रेकॉर्ड व्यवस्थित ठेवणे देखिल अतिशय जरुरीचे असते. त्यामुळे जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा ते त्वरीत मिळते. ठरावीक मुदतीनंतर पोस्ट ऑफिसमधिल रेकॉर्ड बाद होत असते त्याचे वेळीच डिस्पोजल करणे हे देखिल तितकेच महत्वाचे असते. हे काम करायला अनेकजण टाळाटाळ करीत असतात. नियमांची योग्य ज्ञान असेल ते सोपे असते. त्यामुळे नविन तयार होणाऱ्या रेकॉर्डला जागा तयार होत असते. हे सर्व काम बंधूच्या कार्यालयात अप टू डेट असायचे त्याबद्दल देखिल बंधूना प्रशासनाकडून पुरस्कार मिळाला होता. 
     पोस्ट खात्यात दर तिन वर्षांनी रिव्हीजन केस तयार करण्यांत येते. या रिव्हिजन केसचे महत्व स्टाफच्या दृष्टीने आणि जनतेच्या दृष्टीन देखिल खूप असते. कारण या रिव्हिजन केस मधुनच त्या त्या पोस्टामधिल स्टाफची संख्या ठरत असते. असलेला स्टाफ टिकवणे देखिल फार जिकिरीचे असते. कर्मचारी करत असलेल्या प्रत्येक कामाकरीता एक टाईम फॅक्टर असतो. तो अगदी सेकंदात मोजला जातो. त्यामुळे अगदी डोळ्यांत तेल घालुन रिव्हीजन केस बनवावी लागते. ती बनविण्या करीता आवश्वक असणाऱ्या खुब्या बंधूनी मला दिवेआगर येथे त्यांच्या हाताखाली काम करीत असताना शिकवल्या.
     पोस्टामध्ये बऱ्याच वेळा स्टाफ कमी आणि काम जास्त अशी परिस्थिती असते. त्याला कारण ही रिव्हीजन केस योग्य दक्षता न घेता बनविली जाणे हे होऊ शकते. अनेक वेळा टाईम फॅक्टर प्रमाणे पूर्ण वेळ कर्मचारी बसत नसतो. तेव्हा असलेल्या कर्मचाऱ्यांनाचे ते जास्तिचे काम करावे लागते. अशा वेळी अशी कामे जास्तवेळ बसुन करावी लागतात. कधी कधी त्याकामाकरीता नियमात बसत असेल तर ओव्हरटाईम भत्ता मंजूर केला जातो. तो देखिल खूपच अल्प असतो. परंतु त्याला देखिल टाईम फॅक्टर मध्ये बसवुन मंजूर करावा लागतो. ती सुध्दा एक  कसरत असे. या दोन गोष्टी बंधूनी मला उत्तम पध्दतीने शिकवल्या होत्या. त्यामुळे मी नंतर श्रीवर्धन, गोरेगांव, दासगांव आणि पाली या ऑफिसच्या देखिल रिव्हीजन केसेसे बनवल्या होत्या. त्या मी तयार करु शकलो याला बंधूंचे योग्य मार्गदर्शन हे एकमेव कारण होते.
      अशाच प्रकारे पोस्टात एक किचकट काम असते ते म्हणजे, मयत माणसाच्या वारसांना मयताच्या नावावर असलेली रक्कम अदा करणे. यात दोन प्रकार असतात. वारस नेमलेला असेल तर आणि नसेल तर वेगळ्या पध्दतीने ही कागदपत्रे तयार करावी लागायची. आमच्यामधले अनेकजण अशा केसेस टाळायच्या किंवा टोलवायचा प्रयत्न करायचे. परंतु नियमांची योग्य जाण आणि व्यवहार यांचा समतोल साधुन अशा प्रकारच्या केसेस कशा हाताळायच्या यांचे प्रात्यक्षिक बंधूंनी माझ्याकडून करवुन घेतले. त्यामुळे भविष्यात मला अशा केसेस करताना अडचण आली नाही. विशेषत: मी जेव्हा दासगांवला बदलुन गेलो तेव्हा तेथे दरड कोसळण्याची घटना नुकतीच घडली होती. तेथे प्राथमिक शाळेतिल मुलांची १५-२० खाती अशा पध्दतीने बंद करायची होती. त्या प्रत्येक खात्यात अगदी किरकोळ रक्कम जमा होती. परंतु त्या केसेस सहा सात महिने नुसत्याच टोलवल्या जात होत्या. माझ्या दिवेआगर येथील अनुभवाच्या जोरावर मी त्या अगदी कमी कालावधित पूर्ण केल्या होत्या.
     बंधूच्याकडे तेव्हा अनेक प्रकारच्या पोस्टाच्या दैनंदिन व्यवहारात न लागणाऱ्या फॉर्मस् चा खजिना होता. त्यामध्ये डुप्लिकेट पासबुक, डुप्लिकेट बचतपत्र मिळवण्याचा अर्जाचा फॉर्म, वारस नेमणे, बदलणे या सारखे क्वचित लागणारे फॉर्म असायचे. अशा प्रकारचे जवळपास शंभर प्रकारचे तरी फॉर्म त्यांच्या जवळ होते. ते फॉर्मस त्यांनी नंतर माझ्या ताब्यात दिले होते. त्या अर्थाने मी बंधूचा पोस्ट ऑफिसमधिल वारस होतो. पुढे पालीला बदलुन गेल्यावर मी त्याचे एक पी.डी.एफ्. मध्ये हँडबुक तयार केले व ते सर्व पोस्टाच्या स्टाफला विनामूल्य उपलब्ध करुन दिले होते. या शिवाय याची सॉफ्ट कॉपी आजही नेटवर उपलब्ध आहे.   
     बंधूंच्या मार्गदर्शनाखाली मी पोस्टातील नियमांचे आणि निरनिराळ्या तक्त्यांचे माझ्या उपयोगाकरीता एक डायरी तयार केली होती. ती नंतर मी सार्वजनिक केली. त्या डायरीत पोस्टाच्या काऊंटरवर काम करताना किंवा सिंगल हँडेड पोस्टमास्तर म्हणून काम करताना चांगला उपयोग होत असे. त्याचे देखिल मी पोस्टल हँडबुक हे पुस्तक तयार केले. हे पुस्तक देखिल तेव्हा मी सर्वांना मोफत उपलब्ध करुन दिले होते. त्याची देखिल सॉफ्टकॉपी नेटवर उपलब्ध आहे.  त्या पाठिमागची मूळ कल्पना बंधूंचीच होती. अशा प्रकारे बंधूची छाया माझ्या पौष्टीक(पोस्टातील कामकाजात) जीवनार पडलेली आहे.
     दिवेआगर आणि बागमांडला हे त्यांचे घरच होते. त्यांच्यावर डोळे मिटून विश्वास ठेवणारे या दोन्ही गावांत असंख्य लोक होते. त्याला कारण ते नेहमीच मोठ्या भावाच्या भूमिकेत असत. छोट्या पोस्टांत कॅश मॅनेजमेंट हा मोठा जिकिरीचा विषय असायचा. परंतु बंधूच्या लोकांशी असलेल्या घरगुती संबंधामुळे ते तो सहज सोडवायचे. त्याकाळात पोस्टामध्ये टारगेट हा विषय नसायचा, परंतु जेव्हा ग्रामिण डाक जिवन विमा हा नवीन सेवेचा प्रकार सुरु झाला तेव्हा त्याचे टारगेट देणे सुरु झाले. तेव्हा बंधूच्या मोठ्या भावाच्या भूमिकेची खूपच मदत झाली. आम्हाला तेव्हा कोणाच्याही घरी न जाता आमचे टारगेट पूर्ण करता यायचे. ते पोस्टाच्या बाहेरच्या बाकावर बसायचे तेव्हा तिथे अनेक जण यायचे त्यांची चौकशी करता करता ते उत्पन्न किती खर्च किती असे एखाद्याला सहज विचारायचे. त्यातुन शिल्ल्क रहाणारी रक्कम किती याचा हिशेब करुन त्याला पोस्टात खाते काढुन त्याला बचतीची सवय लावायचे. असे तेथे अनेकजण होते.
     अशा या माझ्या वडिल बंधूंना आणि पोस्टातील गुरुंना माझा मानाचा मुजरा. त्यांना निरामय दिर्घायुष्य लाभो ही परमेश्वराच्या चरणी प्रार्थना.  

।। जय जय रघुवीर समर्थ ।।