।।द्वितीयं ब्रह्मचारिणी।।
मूल
मंत्र
दधाना
करपद्माभ्यामक्षमालाकमण्डलम्।
देवी
प्रसीदतु मयि ब्रह्मचारिण्यनुत्तमा॥
ध्यान
मंत्र
वन्दे
वांच्छितलाभाय चंद्रार्धकृतशेखराम्।
जपमाला
कमण्डलुधरां ब्रह्मचारिणी शुभाम्।
गौरवर्णा
स्वाधिष्ठानस्थितां द्वितीय दुर्गा त्रिनेत्राम्।
धवल
परिधानां ब्रह्मरुपां पुष्पालंकार भूषिताम्।
पदमवंदनां
पल्लवाधरां कांतकपोलांपीन पयोधराम्।
कमनीयां
लावण्यां स्मरेमुखीं निम्न नाभिंनितमबनीम्।।
स्तोत्र
तपश्चारिणी
त्वं हितापत्रय निवारणीम्।
ब्रह्मरुपधरा
ब्रह्मचारिणीं प्रणमाम्यहम्।।
नवचक्रभेदनी
त्वंहिनवऐश्वर्यप्रदायनीम्।
धनदासुखदा
ब्रह्मचारिणी प्रणमाम्यहम्।।
शंकरप्रियात्वंहिभुक्ति-मुक्ति
दायिनी।
शांतिदामानदा ब्रह्मजारिणी प्रणमाम्यहम्।।
कवच
त्रिपुरामे
ह्रदयेपातु ललाटेपातु शंकरभामिनी।
अपर्णा
सदापातु नेत्रोअधरोच कपालो।।
षोडशी
सदापातु नाभोगृहोच पादयो।
अंगं
प्रत्यंगं सतत पातु ब्रह्मचारिणी।।
कुश्मांडा
रुपानंतर देवी पार्वती ने दक्ष प्रजापतीच्या घरी जन्म घेतला. शंकराला आपला पती
म्हणून प्राप्त करण्यासाठी तिने हजारो वर्षे अत्यंत कठोर तपस्या केली. याच
कारणास्तव तिला देवी ब्रह्मचारिणी असे म्हणतात. नवरात्री उत्सवाच्या दुस-या दिवशी आई दुर्गेच्या
ब्रह्मचारिणीच्या स्वरुपात पूजा अर्चना केली जाते. देवीचे भक्तगण या दिवशी आपले मन
आईच्या चरणकमलावर ठेवतात. ब्रह्म याचा अर्थ आहे तपस्या आणि चारिणी म्हणजे आचरण
करणारी. म्हणजेच ब्रह्मचारिणीचा अर्थ होतो तपाचरण करणारी. भगवान शंकरांना
पतिस्वरुपात प्राप्त करण्यासाठी घोर तपस्या केल्या कारणाने देवी मातेला तपश्चारिणी
अर्थात ब्रह्मचारिणी म्हटले जाते.
आपल्या
वडिलांनी आपल्या पतीचा अपमान केल्यामुळे पुढच्या जन्मी आपल्याला आपल्या पतीचा आदर
करणारा पिता मिळावा यास्तव तिने आत्मदहन केले. त्यामुळे तिला महान देवी सती असेही
नाव पडले. देवी ब्रह्मचारिणी च्या एका हातात
कमंडलू व दुसऱ्या हातात जपमाळ असून ती अनवाणी चालते. सर्व संपत्ती प्रदान करणाऱ्या मंगळ ग्रहावर देवी ब्रह्मचारिणी चे राज्य
आहे. अश्या ह्या देवी ब्रह्मचारिणी चे
नवरात्री च्या दुसऱ्या दिवशी पूजन करतात.
आई
दुर्गेचे हे स्वरुप भक्तांना आणि सिद्धांना अनंत फलदायी आहे. या स्वरुपाची उपासना
केल्याने तप, त्याग, वैराग्य, सदाचार आणि संयम यांची वृद्धी होते. देवीचे हे
स्वरुप ज्योतिर्मय आणि अत्यंत भव्य आहे.
पूर्वजन्मी या देवीने
हिमालयाच्या घरी मुलीच्या स्वरुपांत जन्म घेतला होता. तेव्हा तिने नारदमुनींच्या
उपदेशानुरुप भगवान शंकरामना पतिस्वरुपात प्राप्त करण्या साठी घोर तपश्यर्या केली
होती. या घोर तपसाधनेमुळेत आईला तपश्चारिणी म्हणजेच ब्रह्मचारिणी या नावांने जाणले
जाते.
या तपसाधने एक हजार वर्ष पर्यंत आईने
केवळ फळे फुले ग्रहण करुन घालवली. शंभर वर्षे जमिनीवर गवताच्या शय्येवर राहून फक्त
पानांवर निर्वाह केला होता. कष्टप्रद उपवास करुन उघड्या आकाशाखाली उन्हात आणि
पावसात अनेक दिवस अपार कष्ट सोसले. तिन हजार वर्षांपर्यंत झाडावरुन पडलेल्या
बिल्वपत्रांचा आहार करुन भगवान शंकरांची आराधना केली. त्यानंतर बिल्वपत्रांचा आहार
देखिल बंद केला आणि हजारो वर्षे निर्जल आणि निराहार राहून तपस्या केली.
बिल्वपत्रांचे सेवन बंद केल्यामुळे आईचे नांव अपर्णा असे पडले. कठीण तपस्या
केल्याने देवीचे शरिर एकदम क्षीण झाले. देवता, ऋषी, सिद्धगण, मुनी या सर्वांनी
ब्रह्मचारिणीच्या तपाचरणाचे कृत्य अभूतपूर्व आहे असे म्हटले, अशाप्रकारचे कठोर
तपाचरण यापूर्वी कोणिही केले नाही असे
म्हणून देवीला अशाप्रकारचे तपाचरण आई तुलाच शक्य आहे असे सांगितले. त्याचबरोबर
तुझी मनोकामना पूर्ण होऊन तुला इच्छीत चंद्रमौली शंकर तुझे पती होतील तेव्हा
आता तू तपस्या सोडून घरी जा. लवकरच तुझे
पिता तुला बोलवायला येतिल असेही सांगितले.
आई ब्रह्मचारिणी देवीच्या कृपा
प्रसादाने सर्वसिद्धी प्राप्त होतात. देवीच्या या कथेचे सार हेच आहे की जिवनात
कितीही कठीण प्रसंग आले तरी मन विचलित होता कामा नये. मूल मंत्र, ध्यान, कवच यांसह विधी विधानानुसार उपासना करणा-या साधकाला
आई ब्रह्मचारिणी अनंत फळप्राप्ती प्राप्त करुन देते. उपासकामध्ये तप, त्याग,
सदाचार, संयम या सारख्या गुणाची वृद्धी होते.
आई ब्रह्मचारिणी देवीची प्रार्थना पुढील मंत्रानी
करावी.
या देवी सर्वभूतेषु
माँ ब्रह्मचारिणी रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै
नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा