गुरुवार, ६ ऑक्टोबर, २०१६

गुरु दक्षिणा, भाग १

गुरु दक्षिणा

भाग १
      अजय, अतुल, मानसी आणि घनश्याम हे हायस्कूलपासुन एकमेकांचे जिवलग दोस्त. अजयने सॉफ्टवेअर मध्ये डिग्री केली. अतुलने सि ए केले. मानसी गायनालॉजिस्ट होती. घनश्यामला घरच्या परिस्थितीने जास्त शिकता आले नाही. तशी सगळ्यांच्याच घरची आर्थिक परिस्थिती चांगली होती. चौघेही चिपळुणच्या परशुराम हायस्कूलमध्ये पाचवी ते दहावी पर्यत शिकले होते. चौघेही सध्या वेगवेगळ्या ठिकाणी रहात होते तरीही त्यांचा एकमेकांशी सतत संपर्क चालूच होता.
      चौघेही १९९५ मध्ये परशुराम हायस्कूल मधुन १०वी पास झाले होते. अजय सध्या मुंबई येथे एका अमेरीकन कंपनीमध्ये सिनिअर सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करित आहे. अतुलची पुण्याला स्वत:ची टॅक्स कनस्लटंटची फर्म आहे. मानसीचे अलिबाग येथे स्वत:चे हॉस्पिटल आहे. घनश्यामने वडिलार्जित जमिनीमध्ये परशुरामजवळ स्वत:चे फार्म हाऊस आणि पर्यटकांसाठी अद्ययावत रिसॉर्ट सुरु केलेल्याला आता १० वर्षे झालीत.
 एकुणच सर्वजण आर्थिक बाबतित सुस्थितित आहेत. सर्वांची लग्नकार्य होऊन कौटुंबिक बाबतीतही ते  सर्व आता स्थिरस्थावर झाले आहेत. वर्षातुन एकदातरी या चार फॅमिली कोणा एकाकडे एकत्र जमतात. त्या निमित्ताने शाळेतल्या आठवणींना उजाळा देतात आणि परत आपापल्या उद्योग धंद्याला लागतात. प्रत्येक वेळी वर्गातल्या कोणा कोणाच्या आठवणी निघतात. कोण सध्या कुठे आहे, काय करतोय याचा आढावा घेतला जातो.
गेल्या वर्षी घनशामच्या फार्म हाऊसवर सर्वजण जमले होते तेव्हा मानसीने एक कल्पना मांडली होती. ती म्हणत होती आजकाल १० वीच्या १२ वीच्या क्लासमेटच गेट टुगेदर अँरेंज केले जाते. आपणही आपल्या १९९५ च्या १०वी च्या वर्गाचे गेट टुगेदर करुयात. त्यावर सगळ्यांना ही कल्पना आवडली होती. परंतु हे काम सोपे नव्हते.
सर्वप्रथम सगळ्यांची नांवे आणि सध्याची रहाण्याची ठिकाणे आणि संपर्काची साधने फोन नंबर, पत्ता शोधायला हवा होता. सगळ्यांत मोठी अडचण मुलींच्या संपर्काची होती कारण त्या सगळ्यांची आता लग्न झालेली होती. त्यामुळे त्यांना आता नविन नावाने शोधायला हवे होते. ही जबाबदारी सगळ्यांनी मिळुन घनश्यामच्या गळ्यांत टाकली. कारण तो परशुराम हायस्कूलच्या परिसरांत रहाणारा होता. एवढेच नाही तर तो परशुराम हायस्कूलच्या संचालक मंडळात देखिल होता. सर्वप्रथम सगळ्या सहअध्यायिंसोबत संपर्क स्थापित करण्याचे ठरविण्यांत आले. त्याकरिता सोशल नेटवर्कचा वापरही करण्याचे ठरले. आणि ती जबाबदीरी अजयने स्वत:हून आपल्यावर घेतली.
ताबडतोब अजयने व्हॉटस् अँपवर एक ग्रुप स्थापन केला. जसजसा संपर्क होईल तसे एकेकाला ग्रुपवर मेंबर करायला सुरवता करायचे ठरले. मानसीने फेसबुकच्या माध्यमातुन शोध घेण्याचे ठरवले. सर्वांनी आपापल्या परिने शोध मोहिम सुरु ठेवण्याचे ठरवुन सर्वजण आपापल्या दैनंदिन उद्योगासाठी गांवी निघुन गेले.
बघता बघता सहा महिने निघुन गेले. घनश्यामने शाळेंतुन सहाध्यायांच्या नांवाची यादी मिळवली. त्या त्या व्यक्तिच्या घरी संपर्क करुन त्यांचे पत्ते फोन क्रमांक मिळवायला सुरवात केली. ते फोन नंबर अजयकडे पाठवले. त्यापैकी जे व्हॉटस् अँप वापरत होते त्यांना ग्रुपमध्ये अँड केले. जे वापरत नव्हते त्यांना मेसेज पाठवुन व्हॉटस् अँप वापरायची सुचना केली. मानसीनेही आपल्या हॉस्पिटलच्या व्यापातुन रोज कमित कमी एक तास वेळ काढुन फेसबुकवर शोध मोहीम सुरु ठेवली. या सगळ्या  प्रयत्नांचे फलित म्हणजे आता त्यांचा ३५ पैकी ३२ सहाध्यायांशी प्रत्यक्ष संपर्क झाला होता. त्यापैकी ३० जण आता व्हॉटस् अँपवर रेग्युलर चॅटींग करीत होते. राहिलेल्या तिघांचा शोध सुरु होता. पण आता शोध घेणारे चौघे नाही तर बत्तीसजणं होते.
या बत्तीसांपैकी चौघे परदेशी होते. सहाजणं महाराष्ट्राच्या बाहेर होते. बारा मुंबईत तर सहाजण पुण्यात होते. बाकीचे असेच विखुरलेले होते. मात्र सोशल नेटवर्कमुळे सर्वजण आता एकमेकांच्या संपर्कात होते. आतापर्यंत सर्वांना आपण एकत्र जमले पाहिजे ही कल्पना मान्य झालेली होती. त्यामुळे गेट टुगेदर करायचेच हे फायनल झाले. फक्त कधी आणि कुठे हा मोठा प्रश्न होतो. त्यावर घनश्यामने चिपळुणला आपल्या हायस्कूल मध्येच घ्यायचे हे ठामपणाने सांगितले. त्यामुळे कुठे हा विषय निकालात निघाला. राहीला प्रश्न कधी तो देखिल सुटला. कारण मानसीने प्रस्ताव ठेवला की, पावसाळ्यातच करुया कारण त्या वेळी केल्यास वर्षा सहलीचा आनंदही घेता येईल. तो प्रस्ताव ही सर्वमान्य झाला.
अखेरीस लावणीची कामे आटोपली की जुलैच्या अखेरीस केव्हातरी हा कार्यक्रम करायचे कायम करण्यांत आले. नेमकी कोणती तारीख ठरवायची याचा अधिकार घनश्यामला देण्यांत आला, कारण सर्व व्यवस्था त्यालाच बघायला लागणार होती. घनश्यामने रिसॉर्टचे बुकींग तपासले, कामाला येणा-या माणसांचा अंदाज घेतला. येणा-या सर्वांची व्यवस्था रिसॉर्टवरच करायची ठरवुन त्याने ३१ जुलै ही तारीख कायम केली.
शाळेचे त्यावेळचे मुख्याध्यापक, शिक्षक यांना विशेष निमंत्रणे पाठविण्यात  आली. परत एकदा चौघे मित्र एकत्र जमले. कामाच्या जबाबदा-या ठरवल्या गेल्या. कार्यक्रम पत्रिका तयार करण्यांत आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्याची जबाबदारी मानसीनेवर टाकण्यांत आली. बजेट ठरवण्यांत आले. सर्व पाहूणे ३० जुलैला संध्याकाळपर्यंत जमा होतिल आणि सोमवारी १ ऑगस्टला सकाळी चहापाणी करुन जातिल असे ठरवण्यांत आले.
शेवटी शेवटी राहिलेल्या दोघांशीही संपर्क झाला. अशा त-हेने मे महीन्याच्या सुरवातिलाच ग्रुपवर सविस्तर माहिती देण्यांत आली. त्यामध्ये चिपळुणच्या रेल्वेचे टाईम टेबलही देण्यांत आले जेणेकरुन प्रत्येकाला रिझर्वेशन करणे सोईचे व्हावे. मे महिन्याच्या अखेर पर्यंत सर्वांचे कार्यक्रमाला उपस्थित रहात असल्याचे कन्फर्म मेसेज आले. सोबत ठरलेल्या रक्कमेचे चेक देखिल आले.
क्रमश: पुढे चालू ............

      ********


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा