मंगळवार, ४ ऑक्टोबर, २०१६

नवदुर्गांची माहिती भाग १

।।प्रथमं शैलपुत्री।।

मूलमंत्र
वन्दे वांच्छितलाभाय चंद्रार्धकृतशेखराम्‌।
वृषारूढ़ां शूलधरां शैलपुत्रीं यशस्विनीम्‌ ॥
ध्यान मंत्र
वन्दे वांच्छितलाभाय चंद्रार्धकृतशेखराम्‌।
वृषारूढ़ां शूलधरां शैलपुत्रीं यशस्विनीम्‌ ॥
पूणन्दुनिभांगौरी मूलाधार स्थितांप्रथम दुर्गा त्रिनेत्रा।
पटाम्बर परिधानां रत्नकिरीठां नानालंकारभूषिता।
प्रफुल्ल वंदना पल्लवाधंराकातंकपोलांतुगकुचाम्।
कमनीयां लावण्यांस्मेरमुखी क्षीणमध्यांनितम्बनीम्।
स्तोत्र
प्रथम दुर्गा त्वंहिभवसागर तारणीम्।
धन ऐश्वर्य दायनीं शैलपुत्री प्रणमाम्यहम्।
चराचरेश्वरी त्वंहिमहामोह विनाशिन।
भुक्ति मुक्ति दायनी, शैलपुत्री प्रणयाम्यहम्।।
कवच
ओमकार: मेशिर: पातुमूलाधार निवासिनी।
हींकार पातुललाटेबिजरुपामहेश्वरी।
श्रींकारपातु वदने लज्जारुपामहेश्वरी।
हुंकारपातु ह्रदये तारिणी शक्ति स्वघृत।
फटकार: पातु सर्वांगे सर्व सिद्धि फलप्रदा।
     देवी दुर्गेची नऊ रुपे आहेत. तिच्या प्रथम दुर्गा स्वरुपाला शैलपुत्री या नांवाने ओळखले जाते. पर्वतराज हिमालयाच्या घरात कन्येच्या स्वरुपात जन्म घेतल्यामुळे तिचे नांव शैलपुत्री असे झाले. नवरात्री उत्सवात पहिल्यादिवशी हिचे पूजन केले जाते.
          आई दुर्गेला सर्वप्रथम शैलपुत्री म्हणून ओळखले जाते. हिमालयाची कन्या म्हणून जन्म घेतल्यामुळे तिचे नांव शैलपुत्री असे झाले. हिचे वाहन नंदी नावाचा वृषभ आहे, म्हणून हिला वृषारुढा म्हणून सुद्धा ओळखले जाते. हिच्या उजव्या हातात त्रिशूल आणि डाव्या हातात कमळ धारण केलेले आहे. सर्व प्रकारची सुख संपत्ती देणारा ग्रह म्हणजे चंद्र. या चंद्रावर राज्य करणारी ती शैलपुत्री. चंद्राचे काहीही दुष्परिणाम तुमच्या आयुष्यात होत असल्यास शैलपुत्री मातेचे पूजन करावे. ही प्रथम दुर्गा आहे. हिला सती म्हणून देखिल ओळखले जाते. याची एक विलक्षण कथा आहे.
     एकदा प्रजापतिने यज्ञ केला तेव्हा त्याने भगवान शंकरांशिवाय सर्व देव देवतांना यज्ञासाठी निमंत्रित केले. सती त्या यज्ञसमारंभामध्ये जाण्यासाठी व्याकुळ झाली. तेव्हा भगवान शंकरांनी तिला निमंत्रण नसताना यज्ञस्थळी जाणे उचीत नाही. शेवटी तिच्या प्रबळ इच्छाबघुन त्यांनी तिला तिथे जाण्यास अनुमती दिली.
सती जेव्हा यज्ञस्थळी पोचली तेव्हा फक्त तिच्या आईनेच तिची विचारपुस केली. बहिणींच्या बोलण्यामध्ये तिचा उपहास आणि कुचेष्टा होती. आणि भगवान शंकरांच्या बाबतित तिरस्कार व्यक्त होत होता. दक्षाचा भाषा देखिल भगवान शंकरांबद्दल अपमानजनकच होती. या सर्वप्रकाराने सतीला अत्यंत  क्लेश झाले व तिवे योगाग्नीद्वारे स्वत:ला जाळुन घेतले. या सर्वप्रकाराने दु:खी होऊन भगवान शंकरांनी त्या यज्ञाचा विध्वंस केला. ह्याच सतीने पुढील जन्मात शैलपुत्रीच्या स्वरुपात पर्वतराज हिमालायाच्या पोटी जन्म घेतला. शैलपुत्रीचासुद्धा विवाह भगनान शंकरांच्याशी झाला. हिलाच पार्वती आणि हेमवती या नावांने ओळखले जाते. शैलपुत्रीची शक्ती आणि महत्व अनन्य आहे. शैलपुत्री मातेच पूजन करताना हा मंत्र बोलवा.
माता शैलपुत्रीची आराधना मूल मंत्र, ध्यान, कवच आणि विधी विधानानुसार करणा-या साधकाला कधिही धन धान्यादि ऐश्वर्याची कधीही कमी पडत नाही तो सर्वप्रकारच्या ऐश्वर्याने संपन्न होतो.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी योग साधनेला प्रारंभ करणारा साधक आपल्या मनांत मूलाधार चक्र जागृत करुन आपली उर्जा शक्तिला केंद्रित करतो ज्या योगे त्याला अनेक सिद्धी प्राप्त होतात.
शास्त्रांमध्ये माता शैलपुत्री देवीला तिन्ही लोकांतिल वन्य जिव जंतुंचे रक्षक मानले आहे.
या देवी सर्वभू‍तेषु माँ शैलपुत्री रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।।



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा