समर्थ रामदास स्वामी विरचित मारूती स्तोत्रे
१३
भिम
भयानक तो शिक लागवी ।
भडकला
सकळां भडकावी ।।
वरतरू
वरता तडकावी ।
बळकटां
सकळां धडकावी ।।१।।
सकळ
ते रजनी चरभारे ।
सकट
बांधत पुच्छ उभारे ।।
रडत
बोलति वीरच सारे ।
न
दिसतांचि बळें भुभु:कारे ।।२।।
जळतसे
त्रिकूटाचळ लंका ।
धरितसे
रजनीचर शंका ।।
उमजती
उमजे वरघाला ।
अवचितां
बुडवी सकळांला ।।३।।
कठिण
मार विरांस न साहे ।
रूधिरपूर
महीवरि वाहे ।।
बहुत
भूत भुतावळि आली ।
रणभुमीवरि
येउनि घाली ।।४।।
अमर
ते म्हणती विर आला ।
नवल
हें पुरलें सकळांला ।।
उदित
काळ बरा दिसताहे ।
विधिविधान
विधी मग पाहे ।।५।।
।। जय जय रघूवीर समर्थ ।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा