।। श्रीराम ।।
।। श्री समर्थ रामदास स्वामी विरचीत मारूती
स्तोत्रे ।।
१
भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती
।
वनारी
अंजनीसूता रामदूता प्रभंजना ॥ १॥
महाबळी
प्राणदाता सकळां उठवी बळें ।
सौख्यकारी शोकहर्ता धूर्त वैष्णव गायका ॥ २॥
दिनानाथा
हरिरूपा सुंदरा जगदंतरा ।
पातालदेवता
हंता भव्य सिंदूरलेपना ॥ ३॥
लोकनाथा
जगन्नाथा प्राणनाथा पुरातना ।
पुण्यवंता
पुण्यशीला पावना परतोषका ॥ ४॥
ध्वजांगें
उचली बाहो आवेशें लोटला पुढें ।
काळाग्नी
काळरुद्राग्नी देखतां कांपती भयें ॥ ५॥
ब्रह्मांडें
माइलीं नेणों आंवळे दंतपंगती ।
नेत्राग्नी
चालिल्या ज्वाळा भ्रकुटी ताठिल्या बळें ॥ ६॥
पुच्छ
तें मुर्डिलें माथां किरीटी कुंडलें बरीं ।
सुवर्णकटि
कांसोटी घंटा किंकिणि नागरा ॥ ७॥
ठकारे
पर्वता ऐसा नेटका सडपातळू ।
चपळांग
पाहतां मोठें महाविद्युल्लतेपरी ॥ ८॥
कोटिच्या
कोटि उड्डाणें झेपावे उत्तरेकडे ।
मंद्राद्रीसारिखा
द्रोणू क्रोधें उत्पाटिला बळें ॥ ९॥
आणिला
मागुता नेला आला गेला मनोगती ।
मनासीं
टाकिलें मागें गतीसी तूळणा नसे ॥ १०॥
अणूपासोनि
ब्रह्मांडायेवढा होत जातसे ।
तयासी
तुळणा कोठें मेरुमांदार धाकुटें ॥ ११॥
ब्रह्मांडाभोंवते
वेढे वज्रपुच्छें करूं शके ।
तयासी
तुळणा कैंची ब्रह्मांडीं पाहतां नसे ॥ १२॥
आरक्त
देखिलें डोळां ग्रासिलें सूर्यमंडळा ।
वाढतां
वाढतां वाढे भेदिलें शून्यमंडळा ॥ १३॥
धनधान्य
पशुवृध्दी पुत्रपौत्र समग्रही ।
पावती
रूपविद्यादि स्तोत्रपाठें करूनियां ॥ १४॥
भूतप्रेतसमंधादी
रोगव्याधी समस्तही ।
नासती
तूटती चिंता आनंदे भीमदर्शनें ॥ १५॥
हे
धरा पंधराश्लोकी लाभली शोभली भली ।
दृढदेहो
निःसंदेहो संख्या चंद्रकळागुणें ॥ १६॥
रामदासीं
अग्रगण्यू कपिकुळासि मंडणू ।
रामरूपी
अन्तरात्मा दर्शने दोष नासती ॥ १७॥
॥
इति श्री रामदासकृतं संकट निरसनं
श्री
मारुतिस्तोत्रम् सम्पूर्णम् ॥
।। जय जय रघूवीर समर्थ ।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा