शनिवार, १९ सप्टेंबर, २०२०

श्री समर्थ रामदास स्वामी विरचीत मारूती स्तोत्रे, स्तोत्र दुसरे.

 

।। श्रीराम ।।

।। श्री समर्थ रामदास स्वामी विरचीत मारूती स्तोत्रे ।।

     जनीं ते अंजनी माता जन्मली ईश्वरी तनू ।

     तनू मनू तो पवनू एकची पाहतां दिसे ।।१।।

     त्रैलोक्यीं पाहतां बाळे ऐसे तो पाहतां नसे ।

     अतूळ तूळना नाहीं मारूती वात नंदनू ।।२।।

     चळे तें चंचळे नेटें बाळ मोवाळ साजिरें ।

     चळताहे चळवळी बाळ लोवाळ गोजिरें ।।३।।

     हात कीं पाय कीं सांगों नखे बोटें परोपरी ।

     दृष्टीचें देखणें मोठें लांगूळ लळलळीतसे ।।४।।

     खडी खारी दडे तैसा पीळ पेंच परोपरी ।

     उड्डाण पाहतां मोठें झेपावे रविमंडळा ।।५।।

     बाळाने गिळिला बाळू स्वभावें खेळतां पहा ।

     आरक्त पीत वाटोळें देखिलें धरणीवरी ।।६।।

     पूर्वेसि देखतां तेथें उडालें पावलें बळें ।

     पाहिले देखिलें हातीं गिळिलें जाळिलें बहू ।।७।।

     थुंकोनि टाकितां तेथे युध्द जाले परोपरी ।

     उपरी ताडिला तेणें एक नामचि पावला ।।८।।

     हा गिरी तो गिरी पाहे गुप्त राहे तरूवरी ।

     मागुता प्रगटे धांवे झेंपावे गगनोदरीं ।।९।।

     पळही राहिना कोठें बळेंची घालितो झडा ।

     कडाडां मोजती झाडें वाड वाडें उलंडती ।।१०।।

     पवनासारिखा धांवे वावरे विवरें बहू ।

     अपूर्व बाळलीला हे रामदास्य करी पुढें ।।११।।

    

।। जय जय रघूवीर समर्थ ।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा