समर्थ रामदास स्वामी यांचे अपरिचीत साहित्य
षड्रिपु निरूपण
समास पांचवा-दंभ निरूपण
दंभ हा पांचवा जाणा
महाशत्रु कळेचिना ।
यालागीं भांडणें लोकां
एकमेकां पडेचिना ।।१।।श्रीराम।।
दंभ डांभा बरा वाटे
यालागीं लोक भांडती ।
भांडती मरती जाती
डंभालागीं निघोनियां ।।२।।श्रीराम।।
सकळां पाहिजे डांभा परंतु मिळतो कसा ।
यालागी चुर्मुरीताती बुडाले दु:खसागरी ।।३।।श्रीराम।।
स्वार्थ हा व्यर्थ जाणावा परंतु जन आंधळे ।
दंभानें आंधळे केले ऐसा हा दंभतस्करू ।।४।।श्रीराम।।
शरीर मुख्य जायाचें दंभाची कोण ते कथा ।
सद्यची उमजेना कीं वैर साधी परोपरी ।।५।।श्रीराम।।
देहाचा दंभ तो खोटा परंतु आवडे जना ।
विवेकें पाहतां नाहीं दु:खी होती म्हणोनियां ।।६।।श्रीराम।।
ज्ञानिया दंभ बाधेना एकाएकीं खडाखडी ।
उठोनि चालिला योगी दंभ तें कुतरें किती ।।७।।श्रीराम।।
वैराग्य पाहिजे अंगी उदास फिरती लिळा ।
दंभ
तो उडाला तेथे लोलंगताचि खुंटली ।।८।।श्रीराम।।
निस्पृया दंभ बाधीना निस्पृह पाहिजे बरा ।
अंतरे अंतरा भेदी तेंथे दंभचि नाडळें ।।९।।श्रीराम।।
दंभ तो चोर जायाचा लालची करिती मुढें ।
शेवटीं सर्वही जाते प्रेत होतें भुमंडळीं
।।१०।।श्रीराम।।
मढ्याला कासया व्हावें जाणावें पहिलेंचि हो ।
लावावें कारणीं देहो दंभ कैचा उरेल तो ।।११।।श्रीराम।।
अखंड आठवावे रे मरणाचें ध्यान अंतरीं ।
तेव्हांचि वैराग्य उठे दंभ लोटे परोपकारी
।।१२।।श्रीराम।।
मांसाचा मोधळा याचा दंभ तो कोण तो किती ।
सावधा दंभ बाधीना दुश्चिताला पछाडितो ।।१३।।श्रीराम।।
तो धन्य विवेकी राजा वैराग्यबळ आगळें ।
भक्तीचा वोळला सिंधु दंभ तेथे दिसेचिना ।।श्रीराम।।
इति दंभ निरूपण ।।५।।श्रीराम।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा