।। श्रीराम ।।
श्री समर्थ रामदास स्वामी यांचे अपरिचीत वाङ्मय
।। षड्रिपु निरुपण ।।
समास तिसरा- मद निरूपण
क्रोध तो बोलिला मागें मद तो ऐकिजे पुढे ।
मदाची गुप्त हें कामें
अंतरींचा कळेचिना ।।१।।श्रीराम।।
मद हा वोखटा मोठा मद हा खेद
कारकु ।
मदाने पद लाधेना मद शोक करी
भला ।।२।।श्रीराम।।
देहाचा मद शक्तीचा
द्रव्याचा मद अंतरीं ।
विद्येचा मद भाग्याचा मदरूप
बहुविधा ।।३।।श्रीराम।।
मदानें थोकली विद्या पुढे
आणीक होईना ।
मानेना न मना येना आपुले
होरटी कढे ।।४।।श्रीराम।।
कळेना सृष्टी देवाची
बहुरत्ना वसुंधरा ।
मदाला नावडे कांही सर्व ही
तुच्छ होतसे ।।५।।श्रीराम।।
मदाने भुलला प्राणी विचारें
उमजेचिना ।
पराचें सत्य मानेना विवरेना
कदापिही ।।६।।श्रीराम।।
वेद हो शास्त्र हो चर्चा
नीती हो न्याय हो न हो ।
आपणा पाहणें नाहीं विरंची
बोलला तरी ।।७।।श्रीराम।।
इतरा कोण तो लेखा संतसाधू
महंत हो ।
आपण न्याय केला तो आपुलें
बोलणें बरें ।।८।।श्रीराम।।
चालणें थोर तें माझें माझा
मीच बहू भला ।
न्यायाची गोष्टि मानेना
नीतीनें कोप येतसे ।।९।।श्रीराम।।
आपणापरतें नाही सर्व कांही
भुमंडळीं ।
गुणग्राहकता नाहीं पराचे
तुच्छ होतसे ।।१०।।श्रीराम।।
कैसेनी उमजावा तो हेंकाड
आंधळें गुरूं ।
दिसेना नाकळे कांहीं वळित न
वळे कदा ।।११।।श्रीराम।।
ऐशाचा
संग तो खोटा हित तेथें असेचिना ।
स्वहीत
आपुलें नाहीं परहीत कसें घडे ।।१२।।श्रीराम।।
थोर
आयुष्य मोलाचें मदें व्यर्थचि नाशिलें ।
पापी
हा उमजों नेदी शेवटीं दूरी होतसे ।।१३।।श्रीराम।।
मरतां
मद काशाचा पुसे कोण तया मदा ।
पूर्वीचे
कळाला नाहीं तऱ्हेनें जन्म नाशिला ।।१४।।श्रीराम।।
देह
गेलें बळ गेलें द्रव्य गेले येकीकडे ।
बंड
गेले थोंब गेले एकला जातसे खलु ।।१५।।
इति
मद निरूपणं।।३।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा