उत्थापन
प्रभात काळी उठुनी सकाळी वनमाळी गावा
सद्भावे पदकमली सतत आश्रय मागावा ।।धृ।।
रामकृष्ण हरि विठ्ठल केशव घेऊनिया नामा
ब्रह्मानंदी मग्न होऊनी प्रत्यय जाणावा ।।१।।
नश्वर हा संसार असा निज आत्मा बोधावा
परमार्थी मन वळवुनी शाश्वत मोक्षचि
साधावा।।२।।
सगुणी निर्गुण जाणुनी आत्मा स्वरुपी
मिळवावा
प्रेमळ छंदे गाऊनिया प्रभु हळु हळु
आळवावा।।३।।
*******
गरुडाचे पायी ठेवीन वेळोवेळी डोई
वेगे आणावा तो हरी मग दिनाते उध्दरी।।
पाय लक्ष्मीचे हाती तिचे आम्ही काकुळती
तुका म्हणे शेषा जागे करा ह्रषीकेषा।।
उत्तिष्ठ उत्तिष्ठ गोविंद उत्तिष्ठ
गरुडध्वज
उत्तिष्ठ कमलाकांत त्रैलोक्यं मंगलं
कुरु।।
भूपाळी गणपतीची
उठा उठा हो
सकळिक । वाचे स्मरावा गजमुख ।
रिध्दि-सिध्दिचा
नायक । सुखदायक भक्तांसी ।
सुखदायक दासासी
॥ धृ ॥
अंगी शेंदुराची
उटी । माथां शोभतसे किरीटी ।
केशरकस्तुरी
लल्लाटीं । हार कंठी साजिरा ॥ १ ॥
कानी कुंडलांची
प्रभा । चंद्र-सूर्य जैसे नभा ।
माजीं नागबंदी
शोभा। स्मरतां उभा जवळी तो ॥२॥
कांसे
पितांबराची धटी । हाती मोदकाची वाटी ।
रामानंद स्मरता
कंठी । तो संकटी पावतो ॥ ३ ॥
उठा उठा हो
सकळिक । वाचे स्मरावा गजमुख ।
रिध्दि-सिध्दिचा
नायक । सुखदायक भक्तांसी ।
सुखदायक दासासी
॥ धृ ॥
भूपाळी
रामाची
उठोनियां
प्रातःकाळी । जपा रामनामावळी ।
स्वयें ध्यातो
चंद्रमौळी । शैलबाळीसमवेत ॥ ध्रु. ॥
राम योग्यांचें
मंडण । राम भक्तांचे भूषण ।
राम धर्मांचें
रक्षण । संरक्षण दासांचे ॥ १ ॥
रामे त्राटिका
मारिली । रामें शिळा उध्दरिली ।
रामे जानकी
पर्णियली। गणिका केली ते मुक्त॥२॥
रामें पाषाण
तारिले । रामें दैत्य संहारिले ।
रामें बंदी
सोडविले । मुक्त केले सुरवर ॥ ३ ॥
रामें रक्षिलें
भक्तांसी । रामें सोडविलें देवांसी
रामदासाचे
मानसीं । रामदासीं आनंद ॥ ४ ॥
उठोनियां
प्रातःकाळी । जपा रामनामावळी ।
स्वयें ध्यातो
चंद्रमौळी । शैल्यबाळीसमवेत ॥ धृ ॥
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा