सोमवार, ३० ऑगस्ट, २०२१

 

राम-कृष्ण

आज श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे. त्यानिमित्ताने श्रीराम आणि श्रीकृष्ण यांचे वर्णन असलेले राम-कृष्ण एकरूप हे समर्थ रामदासस्वामी यांचे काव्य आपल्यापुढे सादर करीत आहे.


करा रे जनीं भक्ति या राघवाची । करीता मनीं वेर्थ चिंता भवाची ।

करी बाण कोदंड हे ठाण देखा । मनीं चिंतितां दुर्जना कोण लेखा ।।१।।

खरा कृष्ण हा विष्णु पूर्णावतारी । चतुर्भुज पीतांबरु चक्रधारी ।

गरुडध्वज पावतो लागवेगें । दिनाकारणे सर्व सांडूनि मागें ।।।।

गळा वैजयंती रूळे कंठमाळा । कटीं किंकिणी मेखळा ज्वाळमाळा ।

गुणी राम हा गुणरत्ने अमोघें । प्रभा फाकलीं दुथडी कीर्तिबोधें ।।।।

घरे सुंदरे व्दारका पुण्यभूमी । तयेमाजि हा कृष्णजी निजधामीं ।

गुणे आगळा वर्णितां वर्णवेना। लिळावेश ब्रह्मांदिकां ही कळेना ।।।।

नसे युध्य तेणें चि नामें अयोध्या। प्रतापें ळे आगळा राम योध्या ।

रणी प्राणहर्ता बळाढ्या विरांचा। माहां संकटी कार्यकर्ता सुरांचा ।।।।

चरित्रें विचित्रें करी गोपिनाथु । क्रिडाकौतुकें नाटकी तो समर्थु ।

यमुने तिरीं गोपि गोपाळ बछे । ध्वनी लोधलीं ऊर्ध वाहूनि पुछें ।।।।

छबीने बहू क्षेत्र माही निशाणें । माहाराज हा वर्णिजे यासि कोणे।

दुजी ऊपमा रामचंद्रा न साजे । सुरारीवरी तोडरीं ब्रीद गाजे ||||

जेणे पर्वताचे तळीं गोकुळासीं । बळें राखिले नाथिले काळयासी ।

जेणे घेतले सर्व ही भक्तवोझें। रणी घेतली पांडवालागि जूझे ।।।।

झळाळीत गंडस्थळें कुंडलें तें । उणें बोलिजे सर्व ही उपमेतें ।

जेणे घेतले सर्व लावण्य जाया । नमस्कार माझा तथा रामपायां ।।।।

येमाया यमातें भजा उत्तमातें । तजा आणिकें दैवतें सर्वमत्तें ।

धरा मानसी कृष्ण हा प्रेम सांटी। त्रिभंगी उभा रुपलावण्यपेटी ।।१।।

टिळा रेखिला कस्तुरीकेशराचा । लपेटा सिरी रम्य दिव्यांबरांचा ।

तुळेना समरंगणी शक्ति लाटी । उभा राम तूणीर बांधोनि पाठी ।।१।।

ठकारें उभा देहुडां पाउलीं हा । बळें नेतसे चित्त चोरूनि पाहा ।

मनीं लागली सर्व ही कृष्णगोडी । जनीं सोडितां सर्वथा ही न सोडी ।।१।।

डगा टाकितां दैत्य बाहेर दीसे । तयालागि बिभीषणा राग पूसे ।

पुढे राघवें वाईला चंडमेढा । रणी झोडिला पाडिला दैत्य गाढा ।।१।।

ढळेना प्रिती लागली माधवाची। उभी साजिरी मूर्ति दे चित्सुखाची ।

कृपाळु हरी अंतरीं सर्व जाणे । तया देखतां सर्व हि सूख बाणे ।।१।।

नसे दुख ना दंड ना मृत्यमारु ।  नसे शोक ना लोकनिंदाधिकारु ।

नसे काळ दुकाळ उदेग चिंता । नसे शब्दकापट्य हे रामसत्ता ।।१।।

तनु सांवळी वेणु वाहे त्रिभंगी। किडाकौतुकी गोपि गोपाळ संगी।

स्वयें जाहला कृष्ण हा विश्वसत्ता। धरी रे मना गोपिनाथा समर्था ।।१।।

थरारी धरा सप्त पाताळ जेव्हां । करारी बळें चंड कोदंड तेव्हां ।

सुरांकारणे पेटला राम व्दंव्दा । चपेटातळीं मस्तकें होति चेंदा ।।१।।

दयासागरें नागरें गोपिवेशें । बहू दैत्य संव्हारिले बाळतोषें ।

जयाची अती खोल कौसाल्य बुधी । विचारें माहां मत्त तो दैत्य साधी ।।१।।

धिटा वाजटा किंकिणी च्यापबंदी । झणत्कारती डोलती रामछेंदी।

अती धीर गंभीर तो राम नेणा । बळें सोडिले देव तो देवराणा ।।१।।

नसे तूळणा तूळितां यादवासी । महावीर ने धीर हे सोमवौंसी ।

जयांच्या प्रतापें सदा काळ कांपे । धरा घालिती पालथी सर्व कोपें ।।२०।।

पळाले बळें पीटिले मारूतानें । दडाले पुरीमाजि हे थोर मानें ।

भयें कांपिती लोपती देति थापा । वृथा बोलती कापिती वेर्थ लाफा ।।२।।

फटी फावळी वानरां येक वेळां । चळी कांपती वेर्थ राजे चळाळां ।

बळें नाथिला काळ लंबी बिलंबी । लिळा खेळतां दृमस्तंबीं कदंबीं ।।२।।

बळे आगळा मारुती कोटिगूणें । जया रोमरंध्री निघे सैन्य दुणे ।

दडे मछमूखीं पडे कृष्ण लोभा । चढे विक्रमू आगळी दिव्य शोभा ।।२।।

भला मारुती जिंकिला कृष्णनाथें । रणी रक्षिली पांडवे ती आनाथें।

ध्वजीं लाविला विक्रमें पूर्णकामे । यदुनायकें सत्य नेमें विराम ।।२।।

मनी सर्वदा सर्व कापट्य जागे। दिनाचे परी याचकु भीक मागे ।

नटाचे परी पालटी कृष्ण काया। करी संकटी थोर शत्रु जिणाया ।।२५।।

येणें राघवें मारिला वेर्थ वाळी । नव्हे नीति हे सर्व केली धुमाळी ।

विरोधेविणे सर्व ही राज्य द्वारी । नव्हे निर्मळु राम कापट्यधारी ।।२।।

रघुनंदनें दुष्टसंव्हार केला । अती आदरें धर्म तो रक्षियेला । 

तया वाळिचें ही बरें हीत केलें । कृपाळुपणें मोक्षपंथास नेले ।।२।।

लघुचे परी वेर्य आरण्यपंथे । करुणास्वरें आळवी जानकीतें ।

तया राघवा धीर कैसें म्हणावें । जयां अस्त्रियांचेनि कामें जिणावें ।।२।।

वनीं लाघवी शैल्येजा वेशधारी । सितेसारिखी येकली दिव्य नारी ।

परी अंतरीं नूठिजे काम लेशें । सितेवीण ही राज्य केलें सुरेशें ।।२।।

सवे लागली देवकीनंदनाची । माहां मल्ल चाणूर हो कंदनाची ।

तयावीण आणीक कांहीं दुराशा। तयाचे कृपेची बहूसी मिपाशा ।।३०।।

शवा ऊठवीलें रघुनायकानें । कृपासागरें सूमतीदायकानें ।

कपी सर्व ही सेवीं तो सुवासी। बळे आणिलें त्या लघु ब्राह्मणासी ।।३।।

समस्तामधें सार गोपाळकाला । तया देखतां चाखतां जीव घाला।

स्वयें स्वंगड्या वांटितो कृष्ण पाहा। गडी खेळती तो चि आनंद माहां ।।३।।

हरें जाणिजे राम कोदंडपाणी । अहिल्या सिळारूप लावण्यखाणी ।

जन सर्व आनंदले राज्य केलें । पुढें ग्राम ही मोक्षपंथासि नेलें ।।३।।

क्षमा सर्वदा ऐक्यरूपें करावी। पथी आदरें सार्थकाची धरावी ।

म्हणे दास द्वैतास हो नातळावें । जळाचे परी सर्व भूतीं मिळावे ।।३।।

 

।। जय जय रघुवीर/यदुवीर समर्थ ।।